Tuesday, 22 June 2021

हिंद-प्रशांत क्षेत्रातील स्थिरतेसाठी भारत-इटली-जपान यांची भागीदारी.



🗯भारत, इटली आणि जपान ही राष्ट्रे हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता राखण्यासाठी आणि तेथील स्थिरतेसाठी एकत्र आली आहेत.


🗯या त्रिपक्षी भागीदारीसाठी 18 जून 2021 रोजी करार करण्यात आला.  


♦️जपान देश..


🗯जपान हा पूर्व आशियामधला एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. टोकिओ हे देशाचे राजधानी शहर आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.


🗯आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत, तैवान बेट आणि कूरील बेटे यांच्या दरम्यान लहानमोठ्या बेटाच्या तीन चंद्रकोरी मालिका तयार झाल्या आहेत. यांनाच पुष्कळ वेळा ‘तोरण बेटे’ म्हणून संबोधण्यात येते. या तोरण बेटांत चार मोठ्या व इतर 3400 बेटांचा समावेश होतो. ही सर्व बेटे मिळूनच जपान देश झाला आहे. जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला “उगवत्या सूर्याचा देश” असे संबोधण्यात येते


♦️इटली देश..


🗯इटली हे यूरोपच्या दक्षिणेकडील, आल्प्सपासून भूमध्य समुद्रात शिरलेले, बुटासह पायाच्या आकाराचे प्रजासत्ताक राष्ट्र आहे. हा देश यूरोप व आफ्रिका यांना जवळजवळ जोडणारा दुवा आहे. त्याच्यामुळे भूमध्य समुद्राचे दोन भाग पडतात. इटलीच्या सरहद्दी वायव्येकडे फ्रान्स, उत्तरेकडे स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि ईशान्येकडे यूगोस्लाव्हिया यांच्याशी संलग्न आहेत. इटलीची राजधानी रोम आहे. इटलीमघ्ये युरो / लिरा हे अधिकृत चलन आहे.

No comments:

Post a Comment