Thursday, 24 June 2021

चालू घडामोडीचे प्रश्न व उत्तरे

 ● कोरोना काळात भारत सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत काय करण्यात आले ?

उत्तर : परदेशात  अडकलेल्या भारतीयांची सुटका.  


● उत्तराखंडमध्ये कोणत्या संस्थेने वॉटर स्पोर्ट्स अँड ऍडव्हेंचर इन्स्टिटयूट ची स्थापना केली.   

 उत्तर :  भारत-तिबेट सीमा पोलीस 


● कोणत्या कार्यक्रमात मोदींनी इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह हा प्रस्ताव मांडला ? 

उत्तर : पूर्व आशिया शिखर परिषद 


● 'अन्नपूर्णा पर्वतशिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?   

उत्तर : प्रियानक मोहिते.  


● कोणत्या कंपनीच्या कोळसा गॅसिफिकेशन युरिया साठी केंद्र सरकारने अनुदान मंजूर केले आहे. 

उत्तर : तलचर फर्टिलायझर्स लिमिटेड 


● रासायनिक शस्त्रास्त्र प्रतिबंध मंडळाचे बाह्य लेखा परीक्षक कोण ? 

उत्तर : जी. सी. मुर्मू 


● संयुक्त राष्ट्र संघाच्या कोणत्या परिषदेच्या मंडळांवर भारताची निवड करण्यात आली आहे. 

उत्तर : आर्थिक व सामाजिक 


● चिराग प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे. 

उत्तर : छत्तीसगड


 कोणत्या प्रक्षेपण स्थळावरून ‘क्रू-२’ मोहीम अंतराळात सोडण्यात आली?

उत्तर :-  केनेडी एलसी-३९ए


कोणत्या योजनेच्या अंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरंभ केला?

उत्तर :- सुधारित तंत्रज्ञानासह ग्रामीण भागातील खेड्यांचे सर्वेक्षण आणि मानचित्रण (SVAMITVA)


 केआरआय नानगाला (४०२) नामक लढाऊ पाणबुडी _ या देशाची आहे.

उत्तर :-  इंडोनेशिया नौदल


कोणत्या मंत्रालयाने सरकारमध्ये फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर (FOSS) याला स्वीकारण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी ‘#FOSS4GOV इनोव्हेशन चॅलेंज’ जाहीर केले?

उत्तर :- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय


 ‘आंतरराष्ट्रीय माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुली दिन २०२१’ याची संकल्पना काय आहे?

उत्तर :- कनेक्टिंग गर्ल्स, क्रिएटिंग ब्राइटर फ्युचर्स


कोण अमेरिकेच्या न्याय विभागाचे सहाय्यक महान्यायवादी (अटर्नी जनरल) या पदावर नियुक्ती झालेली पहिली भारतीय वंशाची व्यक्ती ठरली?

उत्तर :- वनिता गुप्ता


 कोणत्या राज्यात नीती खोरे आहे?

उत्तर :-  उत्तराखंड


कोणत्या दिवशी जगभरात ‘शांतीसाठी बहुपक्षीयवाद व मुत्सद्दीगिरी याचा आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा करण्यात येतो?

उत्तर :- २४ एप्रिल


 कोणत्या दिवशी ‘जागतिक आवाज दिन’ साजरा करतात?

उत्तर :- १६ एप्रिल


कोणत्या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट २०२१’ हा अहवाल प्रकाशित केला?

उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी


 ‘वरुण’ ही _ या देशांच्या नौदलांदरम्यान होणारी संयुक्त युद्ध कवायत आहे.

उत्तर :- भारत आणि फ्रान्स


कोणत्या व्यक्तीने भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली?

उत्तर :- नुदलापती वेंकटा रामणा


अलीकडेच महावीर जयंती साजरी करण्यात आली आहे. महावीर जैन धर्माचे कितवे तीर्थंकार होते?

उत्तर :- २४ वे


चीनच्या मंगळ ग्रहावर पाठविलेल्या पहिल्या रोव्हरचे नाव काय आहे?

उत्तर :-  झुरॉंग


 कोणत्या देशात मारीब शहर आहे?

उत्तर :- येमेन


शास्त्रीय गायक राजन मिश्रा यांचे निधन झाले आहे; त्यांचे _ घरान्याशी संबंध होते.

उत्तर :- बनारस घराना


 कोणत्या ठिकाणी कोवलून द्वीपकल्प आहे?

उत्तर :- हाँगकाँग


कोणत्या मंत्रालयाने ‘ग्रामीण आरोग्य सांख्यिकी अहवाल’ प्रसिद्ध केला?

उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय


 २०२२ सालापर्यंत ई-इंधन तयार करण्यासाठी पोर्श आणि सीमेन्स एनर्जी या कंपन्यांनी मान्य केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे?

उत्तर :- हारू ओनी प्रकल्प


कोणत्या संस्थेने ‘इंडिया एनर्जी डॅशबोर्ड्स व्हर्जन २.०’ नामक एका डिजिटल मंचाचे उद्घाटन केले?

उत्तर :- नीती आयोग



 कोणत्या देशाने ‘डिफेन्डर-युरोप २१’ नामक संयुक्त सैन्य कवायतीचे आयोजन केले?

उत्तर :- अमेरिका


लंडनच्या ‘ब्रँड फायनान्स इन्शुरन्स १०० २०२१ ’ अहवालानुसार, ___ जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात बळकट विमा ब्रांड आणि जगातील दहाव्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान विमा ब्रँड म्हणून अस्तित्त्वात आले.

उत्तर :-  जीवन विमा महामंडळ


 कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल फॉरेस्ट गोल्स रिपोर्ट २०२१’ प्रकाशित केला?

उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ


भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ‘सेंट्रल बँक्स अँड सूपरवायजर्स नेटवर्क फॉर ग्रीनिंग फायनॅनशीयल सिस्टम’ (NGFS) या आंतरराष्ट्रीय जाळ्याचा एक भाग बनली; NGFS याचे मुख्यालय कुठे आहे?

उत्तर :- पॅरिस


 कोणत्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करतात?

उत्तर :- ०१ मे


‘कॅरेन बंडखोर गट’ हा _ देशातील सर्वात जुना बंडखोर गट आहे.

उत्तर :- म्यानमार


 कोणत्या संस्थेने “MACS १४०७” नामक एक नवीन सोयाबीन वाण विकसित केले?

उत्तर :- आघरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे आणि भारतीय कृषी संशोधन परिषद


कोणत्या व्यक्तीची अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली?

उत्तर :- अमिताभ चौधरी


कोणत्या संस्थेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी श्वास / SHWAS आणि आरोग / AROG या दोन योजना लागू केल्या आहेत?

उत्तर :- SIDBI


कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ साजरा करतात?

उत्तर :- ०१ मे

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...