Tuesday, 22 June 2021

सीड मिनीकीट’ कार्यक्रमाचा प्रारंभ



🥏2 जून 2021 रोजी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘सीड मिनीकीट’ कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अंतर्गत जास्त उत्पादन देणार्‍या डाळी व तेलबिया पिकांच्या वाणांचे बियाणे शेतकऱ्यांमध्ये वितरित केले जात आहेत.


🎾ठळक बाबी....


🥏राष्ट्रीय बियाणे महामंडळ (NCS), NAFED आणि गुजरात राज्य बियाणे महामंडळ या संस्था शेतकऱ्यांना ‘सीड मिनीकीट’ पुरवित आहेत.


🥏या कार्यक्रमाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत भारत सरकारकडून संपूर्णपणे वित्तपुरवठा केला जातो.

‘सीड मिनीकीट’चे वाटप 15 जून 2021 पर्यंत सुरू राहील, जेणेकरून खरीप पेरणी होण्यापूर्वी बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतील.


🥏डाळींच्या 20,27,318 सीड मिनीकिट, सोयाबीनच्या 8 लक्ष सीड मिनीकिट आणि शेंगदाण्याच्या 74 हजार सीड मिनीकिट शेतकऱ्यांना मोफत देण्यात येतील.

पार्श्वभूमी


🥏कद्रीय सरकार राज्यांच्या सहकार्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत डाळी व तेलबिया यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. 2014-15 या आर्थिक वर्षापासून डाळी व तेलबियांचे उत्पादन वाढविण्यावर नव्याने भर देण्यात आला आहे. त्या प्रयत्नांना चांगले परिणाम मिळाले आहेत.


🥏तलबियांचे उत्पादन 2014-15 या आर्थिक वर्षातील 27.51 दशलक्ष टनांवरून 2020-21 या आर्थिक वर्षात अंदाजे 36.57 दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे, तर डाळींचे उत्पादन याच कालावधीत 17.15 दशलक्ष टनांवरून 25.56 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...