Saturday 30 October 2021

घटनात्मक संस्था ,वैधानिक संस्था व कार्यकारी किंवा सह - संघटना यातील फरक.

▪️'कायदेशीरदृष्ट्या मंडळ व आयोग तीन प्रकारचे असतात—

💥घटनात्मक संस्था

(अ) प्रत्यक्ष राज्यघटनेनुसार किंवा राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार राष्ट्रपतीने स्थापन केलेले मंडळ किंवा आयोग यांन घटनात्मक मंडळ किंवा आयोग म्हणतात.

🎯 यामध्ये खालील मंडळांचा/आयोगांचा समावेश होतो

(१) निवडणूक आयोग
(२) केंद्रीय लोकसेवा आयोग
(३) राज्य लोकसेवा आयोग
(४) वित्त आयोग
(५) अधिकृत भाषा आयोग
(६) मागासवर्ग आयोग
(७) अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग. (८) अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग.

💥वैधानिक संस्था.

(ब) संसदेच्या विशेष कायद्यानुसार बनविलेले मंडळ व आयोग यांना वैधानिक संघटना म्हणतात.

🎯यामध्ये खालील संघटनांच समावेश होतो.

(१) विद्यापीठ अनुदान आयोग
(२) तेल व नैसर्गिक वायू आयोग
(३) प्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळ
(४) उत्पादन व आयातशुल्क केंद्रीय मंडळ
(५) रेल्वे मंडळ
(६) अणुऊर्जा आयोग
(७) पूर नियंत्रण मंडळ.
(८) महिलांसाठी राष्ट्रीय आयोग
इत्यादी.

💥कार्यकारी किंवा सह - संघटना.

(क) केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाने किंवा आदेशाने बनविलेले मंडळ आणि आयोग. याला सह- संघटना म्हणतात. व संबंधित मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली असतात.

🎯यामध्ये खालील संघटनांचा समावेश होतो.

(१) अखिल भारतीय हातमाग मंडळ
(२) नियोजन आयोग
(३) कर्मचारी निवड आयोग
(४) अखिल भारतीय हस्तकला मंडळ इत्यादी.
(५) निती आयोग

No comments:

Post a Comment