२३ जून २०२१

देशाच्या विविध भागात पाच ‘दिव्यांगता क्रिडा केंद्र’ स्थापन केले जाणार..



🌄दशातील दिव्यांग लोकांमधील खेळाविषयीची आवड आणि त्यांनी पॅराऑलिम्पिक खेळांमध्ये केलेली उत्तम कामगिरी लक्षात घेता, केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने देशाच्या विविध भागात पाच 'दिव्यांगता क्रिडा केंद्र' यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.


🌄कद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी यांच्या संदर्भात घोषणा केली असून त्यापैकी एक केंद्र अहमदाबाद या शहरात उभारण्यात येणार असल्याचे निश्चित केले.


🌄गजरात राज्याच्या जामनगर येथे 20 जून 2021 रोजी सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण विभागाच्या योजनेच्या अंतर्गत दिव्यांगजनांना सहाय्यक ठरणाऱ्या उपकरणांच्या वितरणासाठी आयोजित केलेल्या ‘सामाजिक सशक्तीकरण शिबिर’ यामध्ये ही घोषणा करण्यात आली.


🌄शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत केंद्रीय सरकारने गुजरात राज्यासाठी 8.06 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून त्याचा लाभ 2808 लाभार्थ्यांना होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२३ एप्रिल २०२५ टॉप १० चालू घडामोडींचे MCQ

१. भारताच्या नवीन अ‍ॅथलीट पासपोर्ट युनिटला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? ए.आय.ओ.सी. बी. युनेस्को सी. वाडा डी. नाडा उत्तर: सी. वाडा २. ...