Tuesday, 22 June 2021

शाश्वत विकासात स्थान घसरले; नेपाळ, भूटानही भारताच्या पुढे



संयुक्त राष्ट्रांनी २०१५ मध्ये ठरविलेली शाश्वत विकासाची उद्दीष्टये (SDG) गाठण्यात भारताचा वेग कमी पडत असून या यादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताचे स्थान दोन अंकांनी घसरले आहे. 


सध्या १९३ देशांच्या यादीत भारताचे स्थान ११७ क्रमांकावर आहे. भारताचा पर्यावरण अहवाल २०२१ प्रसिद्ध झाला आहे. यानुसार, भारताचे स्थान दोन क्रमांकांनी घसरले आहे. भूक आणि अन्न सुरक्षा (एसडीजी २), लिंग समानता (एसडीजी ५) आणि दर्जेदार पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक औद्योगिकीकरण आणि संशोधन (एसडीजी ९) ही उद्दीष्ट्ये साध्य करण्यात भारताला फारसे यश न आल्याने स्थान घसरल्याचे अहवालात म्हटले आहे. एकूण १०० पैकी भारताचे ६१.९ गुणांक आहेत. 


भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या चार आशियाई देशांचे स्थान भारताच्या आधी आहे


संयुक्त राष्ट्रांनी सर्व सदस्य देशांना २०३० पर्यंत साध्य करण्यासाठी काही निश्चित उद्दीष्ट्ये दिली आहेत. 


ही आहेत १७ उद्दिष्ट्ये

१. गरीबी निर्मूलन, २. भूकेची समस्या मिटविणे, ३. चांगले आरोग्य, ४. दर्जेदार शिक्षण, ५.लिग समानता, ६.शुद्ध पाण्याची उपलब्धता आणि सांडपाण्याची व्यवस्था, ७. शुद्ध ऊर्जा, ८. आर्थिक विकास आणि रोजगार, ९. उद्योग, संशोधन आणि पायाभूत विकास, १०. असामनता कमी करणे, ११. शहरांचा शाश्वत विकास, १२. स्रोतांचा योग्य वापर

जीवांचे संरक्षण, १६. शांतता, न्याय आणि सशक्त संस्था आणि १७. उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी सक्षम जागतिक भागीदारी

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...