Thursday, 24 June 2021

न्यायमूर्ती संजय यादव: अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायधीश.



🔰राष्ट्रपती राम नाथ कोविन्द यांनी उत्तरप्रदेश राज्यासाठीच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश या पदावर न्यायमूर्ती संजय यादव यांची नियुक्ती केली.


🔰भारतीय संविधानाचे कलम 217(1) भारताच्या राष्ट्रपतीला उच्च न्यायालयाचे न्यायधीश नियुक्त करण्याचा अधिकार प्रदान करते.


🔴भारतीय उच्च न्यायालय...


🔰भारताच्या राज्यघटनेत नमूद कलम क्र. 214 अन्वये प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे.


🔰सध्या देशात 25 उच्च न्यायालये (नव्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयामुळे) कार्यरत आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठे निर्माण करण्यात आली आहेत. उच्च न्यायालयात एक मुख्य न्याय‍धीश आणि राष्ट्रपतीच्या आदेशानुसार ठरविण्यात आलेल्या संख्येनुसार इतर न्याय‍धीश असतात. उच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायधिशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.


🔰कवळ दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वतंत्र उच्च न्यायालय आहे.


🔰महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची महाराष्ट्रात पणजी (गोवा), नागपूर, औरंगाबाद अश्या तीन ठिकाणी तीन खंडपीठे आहेत

No comments:

Post a Comment