Tuesday, 22 June 2021

इब्राहिम रईसी यांची इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड



शिया धर्मगुरू असणारे इब्राहिम रईसी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे..


इराणमध्ये सध्याचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांचा राष्ट्राध्यक्षपदावरचा कालावधी संपल्यामुळे इराणमध्ये इराणध्ये काल 18 जून रोजी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. 19 जून रोजी त्याचे निकाल जाहीर झाले.


इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो. एका व्यक्तीला जास्तीत जास्त दोनवेळाच म्हणजे 8 वर्षेच राष्ट्राध्यक्षपदी राहाता येते. सध्याचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी 2013 पासून इराणचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांची या पदावरती 8 वर्षे पूर्ण झालेली आहेत.


कोण आहेत इब्राहिम रईसी?


• 60 वर्षीय इब्राहिम रईसी न्यायपालिकेचे प्रमुख आहेत. त्यांना कट्टरपंथी मानलं जातं.

1979 साली झालेल्या क्रांतीनंतर ते न्यायपालिकेत कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश काळ ते सरकारी वकील होते. 

• 1988 साली इराणमध्ये राजकीय कैद्यांना आणि असंतुष्ट लोकांना सामूहिक मृत्युदंड सुनावला गेला होता. हा निर्णय घेणाऱ्या विशेष आय़ोगात ते सहभागी होते. तेव्हा ते तेहरानच्या इस्लामिक रिव्होल्यूशन कोर्टात डेप्युटी प्रॉसिक्युटर होते.

• मशदाद शहरातील आठवे शिया इमाम रेजा यांच्या पवित्र दर्ग्याचे ते संरक्षकही होते.   •इराणमध्ये सर्वोच्च नेत्याची नियुक्ती 

किंवा पदच्युती करू शकणाऱ्या परिषदेचेही ते सदस्य आहेत.


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...