❗️11 जून ते 13 जून 2021 या कालावधीत ब्रिटनच्या कॉर्नवॉल या शहरात 47 वी जी-7 शिखर परिषद संपन्न झाली.
❗️वर्तमानात ब्रिटनकडे ‘जी-7’ समूहाचे अध्यक्षपद आहे.
☀️जी-7 (ग्रुप ऑफ सेव्हन) विषयी..
❗️1975 साली प्रथम फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली आणि अमेरिका या सहा देशांनी जी-6 समूहाची स्थापना केली. पुढे 1976 साली कॅनडा यात सामील झाले आणि समूहाचे नाव ‘जी-7’ समूह हे पडले.
❗️सन 1997 ते सन 2014 या काळात, या गटात रशियाचा समावेश होता आणि त्यामुळे हा ‘ग्रुप ऑफ एट’ म्हणून ओळखला जात होता. म्हणूनच 2014 साली याची पुनर्रचना झाली असून ते स्थापना वर्ष आहे.
❗️आतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार, या समूहाच्या सदस्यत्वासाठी उच्च निव्वळ राष्ट्रीय संपत्ती आणि उच्च मानव विकास निर्देशांक असणे आवश्यक आहे. या गटातल्या प्रगत अर्थव्यवस्थांची एकत्रित संपत्ती निव्वळ जागतिक संपत्तीच्या 58% आहे.
No comments:
Post a Comment