Tuesday, 4 May 2021

भारतीय नौदलाची ‘समुद्र सेतू द्वितीय’ मोहीम


🔰कोविड-19 विरूद्धच्या देशाच्या लढ्यात साथ देण्यासाठी आणि ‘समुद्र सेतू द्वितीय’ या मोहिमेचा एक भाग म्हणून, विविध देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनने भरलेले क्रायोजेनिक कंटेनर आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे देशात आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या सात नौका तैनात करण्यात आल्या आहेत.

🔰भारतीय नौदलाच्या INS कोलकाता, INS कोची, INS तलवार, INS तबर, INS त्रिकंद, INS जलश्व आणि INS ऐरावत तैनात करण्यात आल्या आहेत.

🅾ठळक बाबी...

🔰INS कोलकाता व INS तलवार हा पर्शियन आखातात तैनात केलेला पहिला जहाजांचा ताफा होता ज्यांना त्वरित या कामासाठी वळविण्यात आले आणि त्यांनी 30 एप्रिल 21 रोजी मनामा (बहरीन) बंदरात प्रवेश केला.

🔰INS तलवार हे 40 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन देशात परतले आहे. INS कोलकाता वैद्यकीय पुरवठा मिळवण्यासाठी दोहा (कतार) येथे रवाना झाले आहे आणि त्यानंतर द्रवरूप ऑक्सिजन टाक्या आणण्यासाठी ते कुवेतला मार्गस्थ होईल.

🔰पूर्वकिनारपट्टीवर, INS ऐरावत यालासुद्धा या कामासाठी वळविण्यात आले आहे, तर गेल्या वर्षी समुद्र सेतू मोहिमेदरम्यान महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या INS जलश्व याची देखभाल दुरुस्ती करून या मोहिमेच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी त्याला तैनात करण्यात आले आहे.

🔰द्रवरूप ऑक्सिजन टाक्या आणण्यासाठी INS ऐरावत सिंगापूरमध्ये दाखल होणार आहे आणि अल्प मुदतीच्या सूचनेनुसार वैद्यकीय साठा आणण्यासाठी INS जलाश्व यालाही त्या प्रांतात सज्ज ठेवण्यात आले आहे.

🔰अरबी समुद्रात तैनात INS कोची, INS त्रिकंद आणि INS तबर या दुसर्‍या तुकडीलाही राष्ट्रीय प्रयत्नात सामील करून घेण्यात आले आहे.दक्षिणी नौदल कमांडमधून INS शार्दुल या मोहिमेमध्ये 48 तासात सामील होण्यासाठी सज्ज आहे.

🅾समुद्र सेतू मोहीम...

🔰समुद्र सेतू मोहीम 2020 साली भारतीय नौदलाने सुरू केली होती. या मोहिमेच्या अंतर्गत, कोविड-19 च्या उद्रेकात शेजारच्या देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 4,000 भारतीय नागरिकांना यशस्वीरित्या मायदेशी आणण्यात आले होते.

No comments:

Post a Comment