Tuesday, 4 May 2021

एक रकमी १२ कोटी लशी विकत घ्यायची महाराष्ट्राची तयारी - उद्धव ठाकरे.

🔰राज्यात शनिवारपासून म्हणजेच १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार की नाही? सुरू झालं तर ते व्यापक स्तरावर होणार की मर्यादित स्वरूपात? किती लोकांना आणि कुठे दिलं जाणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधताना उत्तर दिलं आहे. त्यासोबतच केंद्र सरकारकडे लसींचा पुरवठा वाढवण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

🔰“१८ ते ४४ वयोगटातील ६ कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी जे १२ कोटी डोस आपल्याला आवश्यक आहे. हे सर्व १२ कोटी डोस एक रकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. मी केंद्राला पुन्हा विनंती करतो की आमची पूर्ण तयारी आहे.

🔰कृपया आपण यात लक्ष घालून आम्हाला जास्तीत जास्त लसीचा साठा उपलब्ध करून दिला, तर महाराष्ट्र लवकरात लवकर या कोविडच्या संकटावर मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment