Tuesday, 4 May 2021

जगातील सर्वात मोठ्या विमानाची दुसरी चाचणी यशस्वी.


🔰अमेरिकेच्या स्ट्रेटोलॉंच कंपनीचे तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या विमानाने त्याचे दुसरे चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

🔰ही चाचणी कॅलिफोर्निया येथे घेण्यात आली. चाचणीदरम्यान विमान 14,000 फूट (4,267 मी) उंचीवर ताशी 199 मैल एवढ्या सर्वोच्च गतीपर्यंत पोहोचले होते.

🅾विमानाची वैशिष्ट्ये..

🔰विमानाच्या पंखांच्या विस्ताराची एकूण लांबी 385 फूट (117 मीटर) आहे.
विमान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

🔰विमानाचे शरीर कार्बन-कंपोजिट पदार्थाने तयार केले गेले आहे.

🔰विमान 550,000 पौंड (250 टन) एवढे भार वाहू शकते.

🔰विमानामध्ये एकूण सहा इंजिन बसविण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment