Tuesday, 4 May 2021

टी. रवी शंकर: भारतीय रिझर्व्ह बँकेचे चौथे उपगव्हर्नर

🔰टी. रवी शंकर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

🅾ठळक बाबी...

🔰2 एप्रिल 2021 रोजी टी. रवी शंकर यांनी पदाचा कार्यभार सांभाळला. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी केली गेली आहे.
त्यांची नियुक्ती बी. पी. कानुनगो यांच्या जागी झाली.वर्तमानात, भारतीय रिझर्व्ह बँकेचे इतर तीन उपगव्हर्नर - महेश कुमार जैन, मायकेल पात्रा, राजेश्वर राव.

🅾भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) विषयी...

🔰भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.

🔰RBIचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उपगव्हर्नर नियुक्त केले जातात.

🔰 ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

🔰सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...