🌼 अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांनी दिलेल्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 22-23 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या हवामान विषयावरील नेत्यांच्या व्हर्चुअल शिखर परिषदेत सहभागी होतील.
🌼 पंतप्रधान 22 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 5.30 ते 7.30 दरम्यान होणाऱ्या पहिल्या सत्रात “Our Collective Sprint to 2030” यावर आपले विचार मांडतील.
🌼 या शिखर परिषदेत जगातील सुमारे 40 अन्य नेते सहभागी होत आहेत. मेजर इकॉनॉमीज फोरमचे सदस्य असलेल्या देशांचे आणि हवामान बदलाचा धोका असलेल्या देशांचे ते प्रतिनिधित्व करतील (भारत याचा सदस्य आहे).
🌼 हवामानातील बदल, हवामानसंबंधी उपाययोजनांत वाढ, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अर्थसहाय्य जमवणे, निसर्ग आधारित उपाय, हवामान सुरक्षा तसेच स्वच्छ उर्जेसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान यावर नेते आपली मते व्यक्त करतील.
🌼 राष्ट्रीय परिस्थिती आणि शाश्वत विकासाच्या प्राथमिकतांचा आदर करतांना सर्वसमावेशक आणि लवचिक आर्थिक विकासाशी हवामान कृतीची जग कशी सांगड घालू शकेल यावरही नेते चर्चा करतील.
🌼 नोव्हेंबर 2021 मध्ये होणाऱ्या सीओपी 26 च्या अनुषंगाने हवामानविषयक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आयोजित केलेल्या जागतिक बैठकांच्या मालिकेचा ही शिखर परिषद एक भाग आहे.
No comments:
Post a Comment