Wednesday, 21 April 2021

औषध महानियंत्रकांची ‘स्पुटनिक व्ही’ला मंजुरी


🌼करोनाप्रतिबंधासाठी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिननंतर तिसरी लस


🌼नवी दिल्ली : रशियन बनावटीच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी मंगळवारी तज्ज्ञ समितीच्या शिफारशी तपासून मान्यता दिली आहे. त्यामुळे आता करोना विरोधातील लढय़ात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन या लशीनंतर तिसऱ्या लशीची भर पडली आहे.

भारतात स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी जानेवारीत भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व ऑक्सफर्ड—अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सीरमने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशींना मान्यता दिली होती. स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने मागितली होती . ही लस मे. गमालिया इन्स्टिटय़ूट यांनी तयार केली असून लशीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे.


🌼महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व दिल्ली या तीन राज्यांसह एकूण दहा राज्यांत कोविड १९ विषाणूचे एकूण ८०.८० टक्के रुग्ण आढळून आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १ लाख ६१ हजार ७३६ रुग्ण २४ तासांत सापडले आहेत. जास्त रुग्ण सापडलेल्या इतर राज्यांत छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान व केरळ यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात ५१,७५१, उत्तर प्रदेशात १३,६०४, छत्तीसगडमध्ये १३,५७६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

स्पुटनिक व्ही लस


🌼 चाचण्या- भारत, रशिया, संयुक्त अरब अमिराती, व्हेनेझुएला, बेलारस.


🌼 वार्षिक उत्पादन क्षमता- रेड्डीज- २० कोटी मात्रा, स्टेलिस बायोफार्मा २०कोटी मात्रा, पॅनाशिया बायोटेक- १० कोटी मात्रा.


⭕️ साठवण तापमान मर्यादा- २ ते ८ अंश सेल्सियस.


🌼‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या ८५ कोटी मात्रा भारत दरवर्षी उत्पादित करणार आहे, या लशीला मान्यता देणारा भारत हा ६० वा देश ठरला आहे, असे रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडने म्हटले आहे. भारत हा स्पुटनिक व्ही लशीला मान्यता देणारा पन्नासावा देश ठरला आहे. भारत हा लोकसंख्येची जास्त घनता असलेला देश असून तेथेही आता या लशीला मान्यता देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...