Wednesday, 21 April 2021

नासाच्या हेलिकॉप्टरचे मंगळावर यशस्वी उड्डाण



🧮नासाचे इनजेन्युइटी हेलिकॉप्टर सोमवारी मंगळावरील विरल वातावरणात यशस्वीरीत्या झेपावले. कुठल्याही परग्रहावर हेलिकॉप्टरचे हे पहिले नियंत्रित उड्डाण होते. ही एक मोठी कामगिरी मानली जात असून या कामगिरीला ‘राइट बंधू क्षण’ असे संबोधण्यात आले आहे.


🧮चार पौंड म्हणजे १.८ किलो वजनाच्या इनजेन्युइटी हेलिकॉप्टरमध्ये १९०३ मधील राइट बंधूंच्या विमानाचे काही अवशेष ठेवण्यात आले होते. त्या काळात उत्तर कॅरोलिनात किटी हॉक येथे असाच इतिहास घडला होता. प्रकल्प व्यवस्थापक मिमी आँग यांनी सांगितले की, परग्रहावर आम्ही रोटो क्राफ्ट फिरवण्यात यश मिळवले आहे.


🧮कलिफोर्नियातून हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचे नियंत्रण करणाऱ्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर उडी मारावी तसे सुरुवातीला वर उचलले गेले. नंतर ते परसिव्हरन्स या रोव्हर गाडीपासून २०० फूट म्हणजे ६५ मीटर अंतरावर गेले. प्रत्यक्षात ते रोव्हर गाडीशी जोडलेले होते. त्यामुळे परत आल्यानंतर ते प्राचीन नदीच्या त्रिभुज प्रदेशात असलेल्या मूळ यानापासून फार दूर नाही. सदर हेलिकॉप्टर ८.५० कोटी डॉलर्सचे आहे.


🧮शरीमती मिमी आँग यांनी म्हटले आहे की, हे माझे खरे स्वप्न होते ते साकार झाले. आँग व त्यांच्या चमूने पृथ्वीपासून १.७८ कोटी मैल म्हणजे २.८७ कोटी किलोमीटर अंतरावरील हेलिकॉप्टर यशस्वी उडवण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. एक आठवड्यापूर्वी आज्ञावलीतील चुकीमुळे  हेलिकॉप्टर भरारी घेऊ शकले नव्हते. त्यानंतर तो दोष दुरुस्त करण्यात आला. 


🧮हलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर नियंत्रण कक्षात एकच जल्लोष झाला. सुरुवातीला या हेलिकॉप्टरची सावली असलेले कृष्णधवल छायाचित्र सामोरे आले नंतर हेलिकॉप्टर पुन्हा मंगळाच्या पृष्ठभागावर उतरत असतानाची रंगीत छायाचित्रे आली. नासाला यात ४० सेकंदांचे उड्डाण अपेक्षित होते त्यात ते १० फूट म्हणजे ३ मीटर उंच उडावे, ३० सेकंद त्याने घिरट्या माराव्यात असे अपेक्षित होते. या सर्व अपेक्षा या हेलिकॉप्टरने पूर्ण केल्या.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...