Wednesday 26 June 2024

ससदीय प्रणाली व अध्यक्ष प्रणालीचा तुलनात्मक अभ्यास.

🔵 ससदीय प्रणालीची वैशिष्ट्ये

▪️या प्रणालीमध्ये धोरणे व कृतींसाठी कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते.

1. बहुमताच्या पक्षाची सत्ता

2. सामूहिक जबाबदारीचे तत्त्व

5. राजकीय एकजिनसीपणा : एकच राजकीय विचारसरणी

4. दुहेरी सदस्यत्व : संसद सदस्य मंत्री बनू शकतात. मंत्रिमंडळ व कायदेमंडळ दोहोंचे सदस्यत्व.

5. पंतप्रधानाचे नेतृत्व

6. कनिष्ठ गृहाचे विसर्जन करता येते

7. अधिकारांचे एकत्रीकरण.


🔵 अध्यक्षीय प्रणालीची वैशिष्ट्ये

▪️यथे घटनात्मकदृष्ट्या कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळापासून स्वतंत्र असते.

1. अध्यक्ष आणि सभासद यांची निश्चित

कालावधीसाठी निवड.

2. सामूहिक जबाबदारी नाही.

3. राजकीय एकजिनसीपणा असेलच असे नाही.

4. एकेरी सदस्यत्व

5. अध्यक्षाचे नेतृत्त्व

6. अधिकारांची विभागणी


✅ ससदीय प्रणालीचे फायदे

1. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ यांच्यात सामंजस्य.

2. उत्तरदायी सरकार.

3. विस्तृत प्रतिनिधित्व


✅ अध्यक्षीय प्रणालीचे फायदे

1. स्थिर सरकार.

2. धोरणांमध्ये निश्चितता.

3. अधिकार विभागणीवर आधारित.

4. तज्ज्ञांचे सरकार.


🔴 ससदीय प्रणालीमधील उणीवा

1. अस्थिर सरकार.

2. धोरणांमध्ये सातत्याचा अभाव.

3. अधिकार विभागणीच्या तत्त्वाविरोधी.

4. नवशिक्यांचे सरकार.

👉 उदा.बहुतांशी युरोपीय राष्ट्र, जपान, कॅनडा, भारत, मलेशिया, स्वीडन.


🔴 अध्यक्षीय प्रणालीमधील उणीवा

1. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ यांच्यात संघर्ष.

2. उत्तरदायी सरकार नाही.

3. एकाधिकारशाही 

4. संकुचित प्रतिनिधित्व.

👉 उदा :- अमेरिकन राष्ट्रे काही अपवादसह (उदा. कॅनडा), अफगाणिस्तान, ब्राझील, घाना, मालदीव, रशिया, फिलिपिन्स, तुर्की, बेलारुस, सायप्रस, श्रीलंका.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...