Friday, 16 April 2021

चांदोली राष्ट्रीय उद्यान


◾️सांगली, 

◾️सातारा, 

◾️कोल्हापूर व 

◾️रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे.


🪵 वारणा नदीचा उगम येथेच होतो. 


🪵१७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. 


🪵 चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे.


🪵 चांदोलीच जंगल निम सदाहरित जंगल आहे.येथे 


🪴वनऔषधी वनस्पती

 ऐन,बेहडा,जांभूळ,हिरडा,पांगारा.फणस.माड,उंबर,आवळा,आंबा,आपटा,असे वृक्ष आणिअडुळसा,कढीलिंब,शिकेकाई,तमालपत्र,अशा वनऔषधी आहेत.


🐅 पराणी-

पट्टेवाले आणि बिबट्या ,वाघ ,गवे ,अस्वल, रानडुक्कर, सांबर, वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकुत्री,शेकरु, खवले मांजर, तृण, हरिण इत्यादी वन्य प्राणी आढळतात.


🦚 पक्षी-

महाधनेश,राखीधनेश, रानकोंबड्या, कवडे, गरुड, ससाणे, खंड्या,घारी, बंड्या, सातभा‌ई, सुतार, भारद्वाज, घुबड, चंडोल,पिंगळा, रातवा, कोकिळ, सुभग, स्वर्गीय नर्तक, पावश्या, चातक व  बगळे,पाणकावळे, पाणकोंबड्या व इतर पाणपक्षी आढळतात .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...