🗼‘लिंगभाव संवाद’ कार्यक्रम हा दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन (DAY-NRLM) आणि इनिशीएटीव फॉर व्हॉट वर्क टू अडवांस विमेन अँड गर्ल्स इन द इकॉनमी (IWWAGE) या उपक्रमांचा एक संयुक्त प्रयत्न आहे.
🗼या प्रयत्नांमधून समोर येणारे अनुभव एकाच व्यासपीठावर सामायिक करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने 16 एप्रिल 2021 रोजी या कार्यक्रमाचे आभासी आयोजन केले होते.
🏜लिंगभाव संवाद कार्यक्रम राज्यांना खालील संधी प्रदान करतो:
🗼महिला संस्थाच्या सुधारणांसाठी इतर राज्यांनी हाती घेतलेल्या चांगल्या कार्यपद्धती / उपक्रम समजून घेणे (उदा. महिलांना सुलभरीत्या जमिनीचे हक्क मिळणे, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) मध्ये त्यांचा सहभाग, अन्न, पोषण, आरोग्य आणि पाणी आणि स्वच्छता (FNHW) यासाठी उत्तम कार्यपद्धती, सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी मजबूत संस्था स्थापन करण्यासाठी, आणि महिलांमधील असुरक्षित गटांचे संरक्षण आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी;
जागतिक स्तरावरील लिंगभाव समस्या / प्रश्न समजून घेणे;मद्दे / अंमलबजावणीतील अडथळे कसे हाताळावेत यासंदर्भातील सूचनांसह तज्ञ आणि इतर सहकाऱ्यांसोबत सल्लामसलत.
🗼दशातील / इतर देशांमधील लिंगभाव विषयक प्रश्नांवरील सर्वोत्तम पद्धतींचे एकत्रीकरण करण्यासाठी हातभार;
2016 साली, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन (DAY-NRLM) याने मुख्य प्रवाहातील लिंगभाव विषयक समस्यांच्या समाधानाकरिता एक लिंग परिचालन रणनीती देखील तयार केली, ज्यात लिंगभाव विषयक मुद्द्यांवरील कर्मचारी, संस्था यांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला.
No comments:
Post a Comment