Thursday, 22 April 2021

सागरी पर्यावरणात प्रवेश करणार्‍या प्लास्टिकशी लढा देण्यासाठी भारताचा जर्मनीसोबत करार


🔰गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय आणि GIZ GmbH इंडिया (जर्मनीची संस्था), नेचर कन्झर्वेशन अँड न्यूक्लियर-सेफ्टी या संस्थांनी ‘सागरी पर्यावरणात प्रवेश करणार्‍या प्लास्टिकशी झुंज देणारी शहरे’ ही शीर्षक असलेल्या तांत्रिक सहकार्य प्रकल्पासाठी करार केला आहे.


💢ठळक बाबी


🔰समुद्रामध्ये प्लास्टिकचा प्रवेश रोखण्याच्या पद्धती वाढविण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची रचना केली गेली आहे.


🔰हा प्रकल्प उत्तरप्रदेश, केरळ आणि अंदमान व निकोबार बेटे या राज्यांमध्ये तसेच कानपूर, कोची व पोर्ट ब्लेअर या शहरांमध्ये राबविण्यात येईल.

साडेतीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.


🔰असा अंदाज आहे की जगातील सर्वाधिक प्रदूषित 10 नद्यांद्वारे सर्व प्लास्टिक कचऱ्याचे 15-20 टक्के महासागरामध्ये प्रवेश करीत आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित 10 नद्यांपैकी दोन ‘गंगा आणि ब्रह्मपुत्र’ या भारतामध्ये आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...