Wednesday, 14 April 2021

ऑलिम्पिकसाठी जपानच्या नव्या उपाययोजना


⭕️टोक्यो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर करोना विषाणू संसर्गाचा धोका रोखण्यासाठी आता जपान सरकारने कठोर पावले उचलली असून नव्या उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.


⭕️जपानची राष्ट्रीय लसीकरण मोहीम मागे पडली असून राजधानी टोक्योमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाही रोगप्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी लोकांनी असमर्थता दर्शवली आहे. रात्रजीवनाचा तसेच खाण्यापिण्याचा आस्वाद घेत असताना करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा संसर्ग नंतर कार्यालये, शाळा येथे होत आहे. हे लक्षात घेता बार आणि रेस्टॉरंट्स थोड्या कालावधीसाठी सुरू ठेवण्याच्या सूचना पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी दिल्या आहेत.


⭕️नव्या प्रमाणित कार्यप्रणालीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ११ मेपर्यंत या नव्या प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन जनतेला करावे लागणार आहे.


⭕️ पश्चिम जपानमधील क्योटो आणि ओकिनावा येथे करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे सुगा यांनी चिंता व्यक्त केली आहे. ओसाका, ह््योगो आणि मियागी या शहरांमध्येही सावधगिरीच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...