Tuesday, 6 April 2021

लिंगभाव समानता निर्देशांकात भारत १४० व्या क्रमांकावर.

🔰जागतिक आर्थिक मंचाच्या लिंगभाव समानता २०२१ अहवालात भारत १५६ देशात १४० क्रमांकावर राहिला असून भारताचे स्थान २८ क्रमांकांनी घसरले आहे. दक्षिण आशियात वाईट कामगिरी असलेला भारत हा तिसरा देश ठरला आहे. या अहवालानुसार लिंगभाव समानतेत भारताची टक्केवारी ६२.५ टक्के राहिली असून २०२० मध्ये भारत १५३ देशात ११२ व्या क्रमांकावर होता. आता तो १४० व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

🔰आर्थिक सहभाग व संधी उपनिर्देशांकात भारताची घसरण झाली असून या वर्षी या काही पैलूत भारतातील लिंगभाव समानतेतील दरी ३ टक्क््यांनी वाढली असून ती ३२.६ टक्के आहे. राजकीय सक्षमीकरणात भारताला मोठा फटका बसला असून त्यात १३.५ टक्के नोंद आहे. २०१९ मध्ये भारताची टक्केवारी २३.१ होती ती २०२१ मध्ये ९.१ टक्के झाली आहे.

🔰कामगार- कर्मचारी यात महिलांचा घटता सहभाग हे याचे प्रमुख कारण ठरले असून हा सहभाग २४.८ टक्क््यांवरून २२.३ टक्के झाला आहे. याशिवाय व्यावसायिक व तंत्रज्ञानात्मक भूमिकात महिलांचा सहभाग कमी होऊन तो २९.२ टक्के राहिला आहे. वरिष्ठ व व्यवस्थापकीय पातळीवर महिलांचा सहभाग कमीच असून १४.६ टक्के वरिष्ठ पदांवर महिला आहेत. व्यवस्थापकीय पदांवर महिलांचे प्रमाण ८.९ टक्के आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे उत्पन्न भारतात एक पंचमांश आहे. त्यामुळे भारत खालच्या दहा देशात गेला आहे.

🔰महिलांविरोधातील भेदभाव जास्त असून आरोग्य व जीवन संघर्षात टिकून राहण्याच्या निर्देशांकात भारताने खराब कामगिरी केली आहे. भारत त्यामुळे यात घटक निर्देशांकात खालच्या पाच देशात आहे.

No comments:

Post a Comment