इ.स. १९११ मध्ये या संघटनेची स्थापना झाली. या लीगमध्ये जॉबरची मात्र काहीही भूमिका नव्हती. तिने व्यावसायिक पूर्णवेळ असे कार्यकर्ते निर्माण केले होते. संघटनेचे सर्वात प्रमुख पुढारी ना.म. जोशी हे होते. ते एक उदारमतवादी ब्राम्हण कामगार पुढारी होते. कामगार प्रतिनिधी म्हणून अनेक परिषदांवर त्यांची नेमणूक झाली होती. चौकशी समित्यांसमोरील त्यांच्या साक्षी बहुधा अतिशय सखोल, अभ्यासपूर्ण आणि परिणामकारक असत.
कामगारांनी निर्व्यसनी असावे, काटकसरीने राहावे अशी लीगची तळमळ असे. आरोग्य आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसारही लीग करीत असे. लीगचे कार्यकर्ते वैचारिकदृष्ट्या रुढीप्रिय व सुधारणावादी होते आणि कामगारांची गान्हाणी मालक अथवा सरकार यांच्याकडे मांडणे असा त्यांचा प्रयत्न असे. संपाला ते सातत्याने विरोध करीत असत.
No comments:
Post a Comment