Wednesday, 21 April 2021

कोरोना मुक्त इस्राईल



🎯इस्रायलने व्यापक प्रमाणावर कोरोना लसीकरण मोहीम राबवणे सुरू केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची अट मागे घेतली आणि शिक्षण संस्था पूर्णपणे खुल्या केल्या. 


🎯 सगळ्या प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांचे विद्यार्थी रविवारी शाळेत येऊ लागले आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची गेल्या वर्षभरापासून लागू असलेली अट आरोग्य अधिकाऱ्यांनी मागे घेतली.


🎯इस्रायलने खूप वेगाने लोकसंख्येतील बहुसंख्यांना मोहिमेत लस दिली.


🎯9.3 दशलक्ष नागरिकांपैकी

53 टक्क्यांपेक्षा जास्त जणांची फायझर, बायोएनटेक लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन झाली.


🎯इस्रायलने गेल्या डिसेंबरमध्ये लसीकरण सुरू केल्यापासून कोरोनाचे गंभीर रुग्ण आणि मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...