Monday, 19 April 2021

क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे अद्ययावत चॅफ तंत्रज्ञान भारतात विकसित


🔰संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे अद्ययावत चॅफ / शाफ (Chaff) तंत्रज्ञान विकसित केले आहे.


🔰DRDOच्या जोधपुर येथील संरक्षण प्रयोगशाळेने (DLJ) या महत्वाच्या तंत्रज्ञानाचे तीन स्वदेशी प्रकार विकसित केले आहेत. भारतीय लष्कराच्या गुणात्मक आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने लघु पल्ला चॅफ रॉकेट (SRCR), मध्यम पल्ला चॅफ रॉकेट (LRCR), दीर्घ पल्ला चॅफ रॉकेट (LRCR) विकसित करण्यात आले आहे.


🔰शत्रूच्या रडार आणि रेडीओ फ्रिक्वेन्सी क्षेपणास्त्र यापासून नौदलाच्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी चॅफ तंत्रज्ञानाचा जगभरात वापर केला जातो. शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशा विचलित करून त्यापासून जहाजांचे रक्षण करण्यासाठी हवेत तैनात केलेली अतिशय कमी तीव्रतेची चॅफ सामग्री काम करते.


🔰भारतीय नौदलाने अरबी समुद्रात नौदलाच्या नौकेवर या तीनही प्रकारांच्या नुकत्याच चाचण्या यशस्वीरीत्या घेतल्या. धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचे असलेले हे तंत्रज्ञान कमी कालावधीत स्वदेशात विकसित करून मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी मोकळे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...