Wednesday, 7 April 2021

सन्यदलात नव्या शस्त्रास्त्रांचा समावेश.


🔰भारतीय सैन्यदलात नवी लढाऊ विमाने आणि शस्त्रास्त्रांचा समावेश करणे ही एक सातत्याने सुरु असलेली प्रक्रिया आहे. या प्रक्रीयेअंतर्गत सैन्यदलात समाविष्ट करण्यात आलेल्या काही महत्वाच्या 

शस्त्रास्त्रांची माहिती खालीलप्रमाणे :-

भारतीय लष्कर:

          (i) चिता हेलिकॉप्टर.

          (ii) अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स (ALH) मार्क 0/I/II/III.

          (iii)  अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स (शस्त्रास्त्र प्रणाली अंतर्भूत [WSI]).

          (iv)  20 मीमी टूरेट गन–ALH प्लॅटफॉर्म युक्त (WSI)

          (v)  70 मीमी टूरेट गन – ALH प्लॅटफॉर्म युक्त (WSI).

       

🔴भारतीय नौदल :


          (i)  डोर्नियर 228 लढावू विमान

          (ii)  अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स (ALH MK III)

          (iii) चेतक हेलिकॉप्टर्स

          (iv)  P81 लढाऊ विमान


🔴भारतीय हवाई दल:


(i) राफेल लढाऊ विमाने

(ii) हलकी लढाऊ विमाने

(iii) C-17 आणि C-130 वाहतूक लढाऊ विमाने

(iv) चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स

सैन्यदलात LCH आणि LUH श्रेणीची हेलीकॉप्टर्स समाविष्ट करुन “आत्मनिर्भर भारताला” प्रोत्साहन देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे.


🔰फब्रुवारी 2021 पर्यंत,सरकारने संरक्षण क्षेत्रात विविध उपकरणे आणि इतर वस्तूंच्या निर्मितीसाठी 523 औद्योगिक परवाने जारी केले आहेत.संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

No comments:

Post a Comment