Thursday, 8 April 2021

आबोली (हिरण्यकेशी): महाराष्ट्रातील पाचवे जैविक विविधता स्थळ घोषित


महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील 2.11 हेक्टर एवढ्या क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी” (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्राला ‘जैविक विविधता वारसा स्थळ’चा दर्जा देण्यात आला आहे.


महाराष्ट्र सरकारच्या महसुल व वन विभागाकडून हा दर्जा देण्याविषयीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.


▪️ठळक बाबी


शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून ती मौजे आंबोली (हिरण्यकेशी) या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते. या क्षेत्रात पुरातन असे हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व कुंड आहे. कुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे.


शिस्टुरा हिरण्यकेशी हा एक रंगीबेरंगी लहान मासा आहे, जो भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असलेल्या पाण्यात वाढतो. ही दुर्मिळ माशांची प्रजाती मासेमारीमुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम यांनी घेतला.


वन्यजीव संशोधकांनी ॲक्वा या आंतरराष्ट्रीय मासिकात या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. या संशोधनामुळे सह्याद्री विशेषकरून आंबोली परिसरातील जैवविविधता आणि त्याचे महत्व वाढणार आहे जनसामान्यांमध्ये जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती होणे, त्यातून देवाचा मासा या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास आता मदत होणार असून अशाप्रकारे वारसाचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले आहे.


यापूर्वी राज्य सरकारने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...