Wednesday, 14 April 2021

भारताचे हरेंद्र सिंग अमेरिकेचे हॉकी प्रशिक्षक


🌹भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांची अमेरिका हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


🌹२०१२ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या हरेंद्र सिंग यांनी २०१७ ते २०१८ या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याआधी त्यांनी महिला संघाचे प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी निभावली होती.


🌹५५ वर्षीय हरेंद्र लवकरच आपल्या कुटुंबासह अमेरिकेत दाखल होणार आहेत. २०१८च्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्याचबरोबर भुवनेश्वर येथे झालेल्या २०१८च्या विश्वचषक स्पर्धेत हरेंद्र यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच २०१८ चॅम्पियन्स करंडक आणि २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कांस्यपदकाची कमाई केली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

इंग्रजीतील 100 समानार्थी शब्द (Synonyms) आणि त्यांचे मराठीत अर्थ खाली दिले आहेत:

1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior)  1. Brave – Courageous (शूर)  2. Honest – Truthful (प्रामाणिक)  3. Happy – Joyful (आनंद...