Tuesday, 6 April 2021

भारतातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू अमेरिकेतही

🔶भारतातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू आता अमेरिकेतील एका रुग्णातही सापडला असून स्टॅनफर्ड हेल्थ केअरच्या दी क्लिनिकल व्हायरॉलॉजी लॅबमधील नमुन्यांच्या तपासणीत तो आढळून आला आहे. दुहेरी उत्परिवर्तन असलेला विषाणू भारतात पहिल्यांदा आढळून आला होता. त्यामुळे करोनाचा प्रसार जास्त वेगाने वाढत आहे.

🔶स्टॅनफर्ड रुग्णालयाच्या वेगवेगळ्या तपासणी केंद्रात सॅनफ्रान्सिस्को बे या भागात हा विषाणू सात रुग्णांत सापडला असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे पण त्याला अजून दुजोरा मिळालेला नाही. एका रुग्णात मात्र तो सापडला आहे.

🔶स्टॅनफर्ड हेल्थ केअर स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेच्या प्रवक्त्या लिसा किम यांनी सांगितले की, अमेरिकेत भारतातील दुहेरी उत्पर्वितनाचा विषाणू पहिल्यांदाच सापडला आहे. भारतातील उत्परिवर्तित विषाणूत एल ४५२आर हे उत्परिवर्तन दिसून आले आहे, दुसरे उत्परिवर्तन इ ४८४ क्यू हे आहे. एकाच ठिकाणी अमायनो आम्लांमध्ये दोन उत्परिवर्तने झाली असून ती पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका व नंतर ब्राझीलमध्ये दिसून आली होती.

🔶सध्या अमेरिकेत हा विषाणू सापडला आहे तो विमानाने आलेल्या एखाद्या प्रवाशातून पसरला असावा. डॉ. बेन पिन्स्की यांनी सांगितले की, हा विषाणू वेगाने पसरतो. लसीकरणामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यानंतर विषाणूचा धोका कमी होत जाईल. दरम्यान, ब्रिटनमध्ये सापडलेल्या बी ११७ उत्परिवर्तनाचा समावेश असलेल्या विषाणूचे ३० टक्के कोविड रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत, असे ब्राउन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे अधिष्ठाता आशिष झा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment