Tuesday, 6 April 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्वपरीक्षा रविवारी (ता. 11) होणार आहे.



सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्वपरीक्षा रविवारी (ता. 11) होणार आहे. राज्यभरातील चार लाख 23 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कोरोनामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु, परीक्षा ठरलेल्या दिवशीच होईल, असे आयोगाच्या सहसचिवांनी स्पष्ट केले आहे. 

श्रीगोंदा येथील वैभव शितोळे हा पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन पुण्यातील सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. तर दुसरीकडे प्रीतम कांबळे हा विद्यार्थीही कोरोनाचा बळी ठरला. दोन विद्यार्थ्यांचा दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह तर काही विद्यार्थी क्‍वारंटाइन आहेत. दुसरीकडे राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लागू केलेल्या कडक निर्बंधानुसार शनिवार, रविवारी कडक संचारबंदी असणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवली जाईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोचता येणार नाही. कडक संचारबंदी असल्याने परजिल्ह्यातील मुलांना त्या ठिकाणी राहण्यासाठी अडचणी येणार आहेत. अशी परिस्थिती असतानाही परीक्षा घेतल्यास बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सर्व्हेदेखील केला असून त्यात 79 टक्‍के विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलावी, असा अभिप्राय नोंदविला आहे. 

दरम्यान, सरकारच्या निर्णयानुसार आयोगाने परीक्षेचे नियोजन केल्याचेही सहसचिवांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन नियोजित वेळेत परीक्षा होईल, असेही आयोगाचे सहसचिव सुनील आवताडे यांनी सांगितले. 

परीक्षेची स्थिती... 

गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा : 11 एप्रिल 


परीक्षेला बसणारे विद्यार्थी : 4.23 लाख 


परीक्षा केंद्रे : 1500 


ठळक बाबी... 

परीक्षेसाठी एका वर्गखोलीत असतील 24 विद्यार्थी 


विद्यार्थ्यांना परीक्षा देताना घालावे लागणार कोव्हिड केअर किट 


पेपर सुरू होण्यापूर्वी दीड तास अगोदर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी राहावे उपस्थित 


थर्मल स्क्रीनिंग गनद्वारे घेतली जाईल विद्यार्थ्यांच्या तापमानाची नोंद 


पर्यवेक्षकांना कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक; लसीकरण करून घेण्याचेही आवाहन 




No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...