Thursday, 4 March 2021

जयदीप भटनागर: पत्र सूचना कार्यालय (PIB) याचे नवीन प्रधान महासंचालक.



🔰जयदीप भटनागर यांनी 01 मार्च 2021 रोजी पत्र सूचना कार्यालय (PIB) याच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. भटनागर यांनी 28 फेब्रुवारी 2021 रोजी कुलदीप सिंग धतवालिया यांच्याकडून पदभार स्वीकारला.


🔰जयदीप भटनागर हे भारतीय माहिती सेवेच्या 1986 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी दूरदर्शनच्या वाणिज्यिक, विक्री आणि विपणन विभागाचे प्रमुख म्हणून दूरदर्शनच्या वृत्तविभागात काम केले आहे. त्यांनी पश्चिम आशियाच्या वीस देशांसाठी प्रसार भारतीचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्यांनी आकाशवाणी, वृत्तसेवा विभागाचे प्रमुख म्हणून देखील काम पाहिले आहे.


🔴पत्र सूचना कार्यालय (PIB) विषयी....


🔰वत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना भारत सरकारची धोरणे, कार्यक्रम, उपक्रम आणि त्यांची साध्यता याबद्दल माहिती देणारी ही प्रमुख संस्था आहे.


🔰ही संस्था केंद्रीय सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

जून 1919 मध्ये ब्रिटिश सरकारच्या अंतर्गत एक जाहिरात कक्ष म्हणून संस्थेची स्थापना झाली. 1946 साली संस्थेला वर्तमान नाव देण्यात आले.


🔰बरिटिश काळात संस्थेचे पहिले प्रमुख डॉ एल. एफ. रशब्रुक विल्यम्स हे होते. 1941 साली पहिले भारतीय प्रधान माहिती अधिकारी म्हणून जे. नटराजन यांची संस्थेच्या प्रमुखपदी निवड झाली.

No comments:

Post a Comment