Tuesday, 23 March 2021

NASA-ISRO संस्थेच्या NISAR अभियानासाठी सिंथेटिक अपर्चर रडार.



🌷(SAR) याचा विकास पूर्ण

पृथ्वी निरीक्षण उपग्रहावर ड्युअल-फ्रीक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडारच्या विकासासाठी ‘NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार’ (NISAR) अभियान 2022 साली श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केले जाण्याचे नियोजित आहे. NISAR उपग्रह पृथ्वी निरीक्षणासाठी L-बँड आणि S-बँड SAR अश्या दुहेरी वारंवारितांवर काम करणार.


🌷अलीकडेच, अमेरिकेच्या नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेसह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) NASA-ISRO SAR (NISAR / निसार) उपग्रह अभियानासाठी एका सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) याचा विकास पूर्ण केला आहे.


🌷सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) यामध्ये अत्यंत उच्च-रिझोल्यूशनच्या प्रतिमा तयार करण्याची क्षमता आहे. याचा उपयोग वस्तूंचे द्विमितीय प्रतिमा किंवा त्रिमितीय पुनर्रचना तयार करण्यासाठी केला जातो.


🍃भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) विषयी...


🌷ISRO ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि त्याचे बेंगळुरू (कर्नाटक) या शहरात मुख्यालय आहे. 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झालेल्या ISRO ने पूर्वीच्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेची जागा घेतली. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 


🍃सस्थेनी केलेली कार्ये -


🌷19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या मदतीने आपला ‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.


🌷1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.

22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली.


🌷‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.


🌷फब्रुवारी 2017 मध्ये एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.

ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (GSLV) विकसित केले.


🌷सटलाइट सुचालन प्रणाली ‘गगन’ आणि क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणाली ‘IRNSS’ विकसित केले.यानाला पुढे नेणारे अत्यावश्यक असलेले स्वदेशी ‘क्रायोजेनिक इंजन’ तयार केले.

No comments:

Post a Comment