Tuesday, 23 March 2021

इटली देश आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) मध्ये सहभागी.



🔑इटली देश आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) मध्ये सहभागी झाला. त्याच्या संदर्भात इटली देशाच्या सरकारने सुधारित ISA कार्यचौकट करारावर स्वाक्षरी केली.


🗝आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) विषयी..


🔑2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान करारनाम्याच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) कार्यक्रम हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स या देशांच्या पुढाकाराने चालू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे.


🔑ही 121 देशांच्या सरकारांची एक आंतरराष्ट्रीय युती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली.


🔑भारतात हरयाणाच्या गुडगाव इथल्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE, गवलपहारी) येथे ISAचे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संघटना आहे.

No comments:

Post a Comment