🔰‘महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन’ योजनेच्या अंतर्गत विद्यावेतन मिळविण्यासाठी भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने 27 मार्च 2021 पर्यंत अर्ज मागवले आहेत.
🅾️ठळक बाबी....
🔰ह विद्यावेतन दोन वर्षांचा संमिश्र कार्यक्रम असून यात देशातील भारतीय व्यवस्थापन संस्थांमधील (IIM) वर्ग-सत्र आणि जिल्हा पातळीवरच्या अर्थव्यवस्थेमध्ये कौशल्य नियोजन आणि विकासास प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्याची अनोखी संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध असते.
🔰यासंदर्भातील पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) अहमदाबाद, IIM बंगळुरु, IIM-जम्मू, IIM कोझिकोड, IIM लखनऊ, IIM नागपूर, IIM रांची, IIM उदयपूर आणि IIM विशाखापट्टणम यांच्या सहकार्याने 'महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन 2021-23’ याची घोषणा केली.
🔰तरुण तसेच प्रतिभावान, कृतीशील व्यक्तींना IIMच्या वर्ग-सत्रांमधे एकत्र येत अभ्यास करण्याची आणि जिल्हा पातळीवरच्या अर्थव्यवस्थेत कौशल्य विकास आणि कौशल्य नियोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी होण्याची ही एक अनोखी संधी आहे.
🔰महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन 2021-23, संपूर्ण भारतातील 660 हून अधिक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे.
🔰अर्जदारांसाठी पात्रता निकष: देशभरातील 21-30 वर्ष वयोगटातील भारतीय विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ते मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असावे.
No comments:
Post a Comment