Tuesday, 23 March 2021

करोना - ‘या’ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळाली लस; ठरला लसीकरण पूर्ण करणारा जगातील पहिलाच देश.


🔰जगभरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र या संकटाच्या काळामध्ये जिब्राल्टर नावाच्या छोट्याश्या देशाने कमाल करुन दाखवलीय. आपल्या देशातील सर्व नागरिकांना करोनाची लस देण्याचा पराक्रम या देशाने केलाय.


🔰बरिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार बुधावारी या देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. देशातील सर्व पात्र व्यक्तींना लसीचे दोन डोस देण्यात आल्याचं हॅनकॉक यांनी स्पष्ट केलं आहे.


🔰जिब्राल्टरची लोकसंख्या केवळ ३४ हजारांच्या आसपास आहे. या ठिकाणी चार हजार २६३ करोनाचे रुग्ण आढळून आले होते. देशातील ९४ जणांना करोना संसर्गामुळे मृत्यू झालाय.


🔰हनकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये यासंदर्भात माहिती देताना, “मला ही गोष्ट सांगताना खूप आनंद होत आहे की काल (बुधवारी) जिब्राल्टर जगातील पहिला असा देश ठरला आहे ज्या आपल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलं आहे,” असं सांगितलं. या संकटाच्या प्रसंगी जिब्राल्टरच्या नागरिकांनी दाखवलेला संयम आणि साहसाचं मी कौतुक करतो, असं म्हणत हॅनकॉक यांनी जिब्राल्टरच्या नागरिकांचं कौतुक केलं.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 1 जानेवारी 2025

1) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे ठरले आहेत. 2) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात ममता बॅन...