Wednesday, 12 July 2023

ग्रामपंचायत

– “खेड्याकडे चला” असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. खेडे हि सक्षम व स्वयंपूर्ण झाली पाहिजे यासाठी ‘ग्रामस्वराज्य’ संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली.


– त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात शेवटचा स्टार म्हणजे ग्रामपंचचायत  हा होय.


– भारतातीतील राज्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो


– महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ५ नुसार गावस्तरावर ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते.


– एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्माण करण्याच्या किंवा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो.


– पंचायत राज हा विषय राज्यसूची मध्ये येतो.


– देशातील पहिली ग्रामपंचायात२ ऑक्टोबर १९५९ ला राजस्थानातील नागोरी येथे स्थापन करण्यात आली.


– ग्रामपंचायत हि ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे.


– संपूर्ण देशात सर्वात सक्षम ग्रामपंचायती राजस्थान राज्यात आहे.


– महाराष्ट्रामध्ये २८,००० पेक्षा अधिक ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत.


– महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर.


– महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत सोलापूर जिल्हातील ‘अकलूज’ हि आहे.


– महाराष्ट्रातील विविध विकासयोजना राबविणारी पहिली ग्रामपंचायत अहमदनगर जिल्ह्यातील ‘हिवरे बाजार हि होय.


– महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती सातारा जिल्ह्या मध्ये आहे. ( १४०० पेक्षा अधिक )


– भारतामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती उत्तरप्रदेशा मध्ये आहे.


– ७३ व्य घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज ला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.


– ७३ व्या घटना दुरुस्तीमध्ये अव्यये पहिल्या ग्रामपंचायत निवडणुका एप्रिल १९९५ ला पार पडल्या.


 ग्रामपंचायतीची रचना :


१) सपाट प्रदेशासाठी ६०० लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत.


२) नवीन नकषानुसार ५०० लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत.


३) डोंगरी परदेशासाठी ३०० लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत.


४) काही ठिकाणी प्रसंगी २ किंवा ३ गावाची मिळून एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते तिला गट ग्रामपंचायत (ग्रुप ग्रामपंचायत ) म्हणतात.


५) २०१४ पासून ३५० लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत स्थापन करणे



 ग्रामपंचायतीची सदस्य संख्या :

१) महाराष्ट्रातून लोकसंख्येच्या आधारावर सदस्य संख्या ठरली जाते.

२) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो.

३) महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या ७ ते १७ इतकी आहे.

४) भारतामध्ये ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या ५ ते ३१ इतकी आहे

लोकसंख्या           सदस्यसंख्या

६०० ते १५००           ७

१५०१ ते ३०००         ९

३००१ ते ४५००         ११

४५०१ ते ६०००         १३

६००१ ते ७५००          १५

७५०१ ते पुढे               १७

 सभासद पात्रता :

१) तो व्यक्ती संबंधित गावाचा रहिवाशी असावा.

२) वयाची २१ वर्ष पूर्ण केलेली असावी.

३) संबंधित गावाच्या मतदार यादीत नाव असावे.

४) कोणत्याही सरकारी सेवेत नसावा.

५) ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसावा.

६) १२ सप्टेंबर २००१ नंतर ३ रे अपत्य नसावे.

७) स्वतःच्या राहत्या घरी स्वच्छता गृह असणे बंधनकारक.

८) ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासाठी जात प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली  ( २०१५ पासून )

 सभासद अपात्रता : 

१) दिनांक १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असलेली व्यक्ती

२) राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या अति पूर्ण न केल्यास.

३) अस्पृश्यता कायदा १९५८, महाराष्ट्र दारू बंदी कायदा १९४९ किंवा निवडणूक भ्रष्टाचार कायद्यान्वे दोषी ठरवलेली व्यक्ती

४) स्वतःच्या राहत्या शौचालय नसलेला व्यक्ती

५)  ग्रामपंचायतीचा कर्ज बाजारी असणारा व्यक्ती

६) शासनाच्या किंवा स्थानिक संस्थेचा शासकीय सेवेमध्ये असलेला  व्यक्ती

७) ग्रामपंचायतीमध्ये लाभाचे पद धारण करीत असलेला व्यक्ती

८) सक्षम न्यायालयाने विकल मनाची घोषित केलेली व्यक्ती

९) स्वच्छेने परदेशी नागरिकत्व संपादान केले व्यक्ती

१०) तो व्यक्ती संसद व राज्य विधिमंडळ सदस्य असल्यास

११) ती व्यक्ती पंचायतीच्या अधीन असलेले कोणतेही अधिकार पद किंवा लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...