Thursday, 11 March 2021

पृथ्वी निरीक्षणासाठी इस्रोकडून रडारनिर्मिती



🔰भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने अमेरिकेच्या नासा या संस्थेसमवेत उपग्रहामार्फत संयुक्त पृथ्वी निरीक्षण करण्यासाठी एका उच्च विवर्तनक्षम रडारची निर्मिती केली आहे. त्याच्या मदतीने पृथ्वीच्या अधिक स्पष्ट प्रतिमा घेता येणार आहेत.


🔰नासा आणि इस्रो यांच्या (निसार) या संयुक्त प्रकल्पात दुहेरी कंप्रता एल व एस बँड असलेले रडार पृथ्वी निरीक्षणासाठी वापरले जाणार आहे. ‘निसार’ ही दोन वेगेवगेळ्या कंप्रता ए बँड व एस बँडसाठी असणारी पहिलीच मोहीम आहे. त्यात पृथ्वीचे निरीक्षण काही सेंटीमीटर विवर्तनापर्यंत शक्य होणार आहे, अशी माहिती नॅशनल एरोनॉटिक्स अँड  स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासाने दिली आहे.


🔰नासा व बेंगळुरू येथील भारतीय अवकाश संशोधन संस्था यांनी याबाबतचा भागीदारी करार  ३० सप्टेंबर २०१४ रोजी केला होता. ही मोहीम २०२२ मध्ये सुरू होणार असून इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील नेल्लोर जिल्ह्यत श्रीहरीकोटा येथून हा उपग्रह रडारसह पाठवला जाणार आहे. नासाने यात एल बँड एसएआरची  व्यवस्था केली असून वैज्ञानिक माहिती व जीपीएस सव्‍‌र्हर्स उपलब्ध केले आहेत.


🔰तयात सॉलिड स्टेट रेकॉर्डरचा समावेश असून इस्रो यात एस बँड रडार उपलब्ध करीत असून पृथ्वीवरील पृष्ठभागाचे चित्रण यात केले जाणार आहे. एस बँड एसएआर पेलोड निसार उपग्रह मोहिमेचा भाग असून त्याला अवकाश खात्याने आधीच मंजुरी दिली आहे.  इस्रोच्या अहमदाबाद येथील अवकाश उपयोजन केंद्रातून पेलोड श्रीहरीकोटा येथे पाठवण्यात येत असून नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने एल बँड एसएआर पेलोड तयार केला आहे.

No comments:

Post a Comment