Thursday, 18 March 2021

गोदावरी नदी

 गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातील ०९ जिल्हयातुन वाहते. दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. गोदावरी नदीस “दक्षिण गंगा” किंवा “ब्रहद्ध गंगा” या नावानेही ओळखले जाते.गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  


गोदावरी नदीचा उगम :-


सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हिारी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे. गोदावरी नदी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या देानच राज्यांतुन वाहते. गोदावरी नदीची एकूण लांबी * किमी एवढी आहे.गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते. १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.


गोदावरीच्या उपनद्या


पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका, बोरा इत्यादी.


गोदावरी नदीच्या काठावरील शहरे


नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.


गोदावरी नदीवरील धरणे


गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसाार” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...