Saturday, 27 March 2021

परकीय चलनसाठ्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर.


🔶भारताचा परकीय चलनसाठा (forex reserves) जगात चौथ्या क्रमांकाचा ठरला आहे. भारताने याबाबतीत रशियाला मागे टाकले आहे.


🔶भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, 5 मार्चला भारताचा परकीय चलनसाठा 580.3 अब्ज डॉलरवर होता.


🔶चीनकडे सर्वात जास्त परकीय चलनसाठा आहे, त्यानंतर जपान आणि स्वित्झर्लंड या देशांचा क्रम लागतो आहे. चीनजवळ जगातील सर्वाधिक 3.1 महादम (ट्रिलियन) डॉलर परकिय चलनसाठा आहे.


🔴परकीय चलनसाठा..


🔶परकीय चलनसाठ्याला 'राखीव चलन (Reserve Currency)' असेही म्हणतात. यात परकीय चलनाच्या स्वरूपात साठा ठेवला जातो. प्रत्येक देशाची केंद्रीय बँक ही रक्कम औपचारिक रित्या साठा म्हणून जमा करत असते.


🔶अधिक परकिय चलनसाठा असलेल्या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली प्रतिमा असते. कारण आंतराराष्ट्रीय व्यापारात या चलनसाठ्यावरुन ठरणाऱ्या प्रतिमेचा चांगला उपयोग होतो. अधिक परकिय चलनसाठा असणारा देश परराष्ट्रीय व्यापारात चांगला भाग प्राप्त करतो.


🔶सर्वाधित परकिय चलनसाठा हा अमेरिकन डॉलरमध्ये ठेवला जातो, कारण अमेरिकन डॉलर हे जगातील सर्वाधिक व्यवहारात वापरले जाणारे चलन आहे.


🔶थट गुंतवणूक, त्याचबरोबर शेअर बाजारात झालेली गुंतवणूक याचा विचार करून परकीय चलन विनिमय दरानुसार या साठ्यांचे मूल्यांकन केले जात असते.परकीय चलन साठा केंद्रीय बँकासाठी महसूल मिळविण्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहेत, जे परकीय सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवितात आणि आंतरराष्ट्रीय चलन निधी (IMF) आणि इतर सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये देखील गुंतवणूक करतात.


🔶परकिय चलनसाठ्यामध्ये परदेशी चलन, गोल्ड रिझर्व्ह, SDR आणि IMF कोटा डिपॉसिट, ट्रेझरी बिल, बॉन्ड आणि इतर सरकारी सिक्यूरीटीज समाविष्ट असतात.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...