Saturday, 13 March 2021

बदललेल्या चिनीनीतीनंतर नवीन व्यूहविचार - नौदलप्रमुख



भारतीय नौदल चीनवर लक्ष ठेवून आहे. चीन इतरांप्रमाणे विचार करत नाही, त्यांची रणनीती वेगळी आहे. ते ध्यानात ठेवून आता भारतीय नौदलातर्फे नवीन व्यूहविचार आकारास येत असल्याचे प्रतिपादन नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी बुधवारी केले.


प्रोजेक्ट ७५ अंतर्गत कलवरी वर्गातील तिसरी स्टेल्थ स्कॉर्पिन पाणबुडी ‘आयएनएस करंज’ समारंभपूर्वक नौदलात दाखल झाली. या सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नौदलप्रमुख बोलत होर्ते. हिंदी महासागरातीलच नव्हे तर देशाच्या तिन्ही बाजूंना असलेल्या सागरी सीमा अभेद्या राहण्याची खातरजमा करण्यासाठी अलीकडे देशाच्या संपूर्ण किनारपट्टीवर व बेटसदृश्य असलेल्या केंद्रशासित प्रदेशांच्या सागरीसीमांवरही एकाच वेळेस ‘सी व्हिजिल’ युद्धाभ्यास पार पडला.


त्यामध्ये लक्षात आलेल्या काही बाबींनंतर सागरीसुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे, असे सांगून अ‍ॅडमिरल करमबीर सिंग म्हणाले की, ‘आयएनएस करंज’ ही आत्मनिर्भर भारत योजनेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे.


कारण यापूर्वी कलवरी वर्गातील दोन्ही स्टेल्थ पाणबुड्यांच्या निर्मिती- तपासणी आणि त्यावरील नौदलाच्या ताफ्याचे प्रशिक्षण यात फ्रेंच सहभाग होता. मात्र ‘आयएनएस करंज’ ही पूर्णपणे भारतीय नजरेखाली तयार झालेली पहिलीच पाणबुडी आहे. येणाºया काळात पाणबुडीचा ऊर्जास्रोत असलेल्या प्रोपल्शन यंत्रणेमध्येही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. 

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...