Saturday, 20 March 2021

रामसर करारासंबंधित महत्वपूर्ण माहिती.




🔰 १९७१ साली इराणमधील रामसर शहरात भरलेल्या ‘कन्वेन्शन ऑन वेटलँड्स’ ह्या जागतिक परिषदेला ‘रामसर परिषद’ मानले जाते


🔰 हयाच परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापरासंबंधीचे निर्णय घेण्यात आले


🔰 पाणथळ जागेच्या व्याख्येत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा यात समावेश केला जातो


✍️ भारताने ’रामसर’ करारावर १९८२ साली सही करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले.


🌍 सध्या जगातील २,४४१ पाणथळींना ’रामसर’चा दर्जा प्राप्त आहे


🇮🇳 भारतातील ४२ पाणथळींना ’रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाला आहे


🗓 जगभरात दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘पाणथळ दिन’ म्हणून साजरा केला जातो


🔰 ओडिशातील चिल्का सरोवर हे भारतातील पहिले रामसर स्थळ आहे (१९८१)


🔰 नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे (जानेवारी , २०२०)


🔰 लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे (नोव्हेंबर , २०२०).


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...