Friday, 12 January 2024

राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 1) 1909 च्या कायद्यामधील उणिवा कमी करण्यासाठी 1919 च्या सुधारित कायदा तयार करण्यात आला. या कायद्याचा मसुदा कोणी तयार केला? 

1) लॉर्ड माँटेग्यू व व्हाईसरॉय चेम्सफर्ड ✅✅

2) लॉर्ड मोर्ले व व्हाईसरॉय मिंटो 

3) चेंबरलिन व मूल्टन 

4) डॉ अॅलन सँडल व जेम्स जीन्स




2) अमेरिकेतील ----- या सभागृहामध्ये समानतेच्या तत्वानुसार प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. 

1) House of Representatives 

2)Senate ✅✅

3) House of Commons

4) none of these



3) खालील विधाने कशा संदर्भातील आहेत? 

अ) सरंजामदारांच्या सभेच्या मंजूरीविना राजाला कर लागू करता येणार नाही. 

ब)  आरोप सिद्ध झाल्याशिवाय कोणालाही अटक करून ठेवता येणार नाही अथवा हद्दपार करता येणार नाही किंवा मालमत्ता हिरावून घेता येणार नाही.

क)  कायद्याच्या दृष्टीने श्रीमंत गरीब असा भेदभाव करता येत नाही 

ड)  या तरतुदीमुळे चॅथॅम यांनी त्यास ब्रिटिश शासन पध्दतीचे बायबल मानले आहे. 


1) मॅग्नाकार्टा / महान सनद✅✅

2) कोलंबिया रेजीस

3) मॉडेल पार्लमेंट

4) मॅग्नम कौन्सिलिअम





4) अ गट 

     1) इंग्लंड 

     2) भारत 

     3) स्वित्झर्लंड 

     4) संसदीय व्यवस्था 


     ब) गट 

अ)  लोकसभा 

ब) जबाबदार शासनव्यवस्था

क)  सामान्यांचे सभागृह 

ड)  सत्ताविभाजन, नियंत्रण, व

       संतुलन 

ई)  राष्ट्रीय परिषद 


1) 1-क, 2-अ, 3-ई, 4-ब,5-ड ✅✅

2) 1-ब, 2-अ, 3-ई, 4-क,5-ड

3) 1-क, 2-ड, 3-ई, 4-अ,5-ब

4) 1-ब, 2-ड, 3-अ, 4-क,5-ई




5) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश विरुद्ध महाभियोग खटला चालविण्यास -----

अ) लोकसभा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाला घटनाविरोधी वर्तन, गैरवर्तन, भ्रष्टाचार इ. कारणावरून पदच्युतीचा आदेश काढू शकतो. 

ब) दोन्ही सभागृहांच्या उपस्थित सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने न्यायाधीशांवरील आरोप सिद्ध झाला पाहिजे. 

क) न्यायाधीश चौकशी कायदा 1968 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला संसद महाभियोगाचा खटला चालवून पदावरून बडतर्फ करु शकते. 

वरील पैकी चुकीचे विधान कोणते?


1.फक्त ब

2. फक्त अ✅✅

3. अ व ब

4. ब व क




6) राज्यसभेत लोकसभेप्रमाणे कोणत्या बाबींमध्ये समान अधिकार आहेत?  

1) नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याविषयी 

2) घटना दुरुस्तीमध्ये ✅

3) सरकार हटविण्यासाठी 

4) कपात प्रस्ताव सदर करण्याबाबत





7) अर्थमंत्री संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करताना सोबत आणखी काही दस्तऐवज सादर करतात. ज्यामध्ये 'बृहद आर्थिक रूपरेखा विवरण' (The Macro Economic Framework Statement) चाही समावेश असतो. हा दस्तऐवज खालील मँडेटमुळे सादर केला जातो. 

1)चिरकालिय संसदीय परंपरेमुळे 

2) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 112 तसेच 110(1) मुळे 

3) भारतीय संविधानाच्या कलम 113 मुळे 

4) राजकोषीय उत्तरदायित्व व बजेट व्यवस्थापन अधिनियम, 2003 (FRBM, Act 2003) तील तरतुदीमुळे ✅✅




प्र. 8) राज्यसभेने धन विधेयक दुरुस्तीसह वा दुरुस्तीविरहित 14 दिवसाच्या मुदतीत लोकसभेकडे सादर न केल्यास...

1. ते नामंजूर झाले असे समजण्यात येईल.

2. ते जसेच्या तसे दोन्ही गृहांनी संमत केले असे समजण्यात येईल.✅✅

3. ते पुन्हा नव्याने मांडावे लागेल.

4. त्यावर दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घ्यावा लागेल.



प्र.9) एखादे विधेयक धन विधेयक किंवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार कोणास असतो?

1. राष्ट्रपती

2. लोकसभा सभापती✅✅

3. लोकसभा

4. राज्यसभा




10) 92 वी घटनादुरुस्ती 2003 अन्वये 8 व्या परिशिष्टात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या चारही भाषा खालील पैकी कोणत्या पर्यायात आहेत? 

1) कोंकणी,  मणिपुरी, संथाली, डोगरी

2) संथाली,बोडो,कोंकणी,भोजपुरी

3) बोडो, संथाली, मैथिली, भोजपुरी

4) बोडो, संथाली, मैथिली, डोगरी✅

No comments:

Post a Comment