Thursday, 18 February 2021

नायजेरियाच्या एनगोजी ओकोनजो-इव्हिला: जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) नेतृत्व करणारी पहिली महिला


🔰नायजेरिया देशाच्या एनगोजी ओकोनजो-इव्हिला यांची जागतिक व्यापार संघटना (WTO) याच्या महासंचालक पदी 15 फेब्रुवारी 2021 रोजी निवड झाली.


🔰या नियुक्तीसह 66 वर्षीय एनगोजी ओकोनजो-इव्हिला या जागतिक व्यापार संघटना (WTO) या जागतिक संस्थेचे नेतृत्व करणाऱ्या प्रथम महिला तसेच आफ्रिकेच्या प्रथम व्यक्ती ठरल्या.


🔰तया 1 मार्च 2021 पासून चार वर्षांच्या मुदतीसाठी कार्यालय सांभाळणार आहेत.

यापूर्वी गेल्या सात वर्षांपासून WTOचे नेतृत्व ब्राझीलचे रॉबर्टो अझेवेदो करीत होते.

जागतिक व्यापार संघटना (WTO) विषयी


🔰जागतिक व्यापार संघटना (WTO) ही आंतरसरकारी संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. त्याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे आणि त्याचे 164 देश सभासद आहेत.


🔰1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश कराराच्या अंतर्गत WTO अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत झाले.


🔰WTO वाटाघाटी करता येणार्‍या व्यापार करारासाठी कार्यचौकट प्रदान करून सहभागी देशांमध्ये व्यापाराचे नियमन करते तसेच सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सह्या केलेल्या आणि त्यांच्या संसदेने मान्य केलेल्या WTO कराराप्रती सहभागींची निष्ठा वाढविण्यासाठीच्या उद्देशाने तंटा निवारण प्रक्रिया हाताळते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...