🔰स्क्वेअर किलोमीटर अॅरे वेधशाळा (SKA) परिषदेने जगातली सर्वात शक्तिशाली रेडिओ दूर्बिण याच्या बांधकामासाठी त्यासंबंधी प्रस्तावाला मंजूरी दिले.
💢सक्वेअर किलोमीटर अॅरे (SKA) विषयी
🔰कॉम्प्लेक्स स्क्वेअर किलोमीटर अॅरे (SKA) या नावाची पृथ्वीवरची सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली रेडिओ दूर्बिण (telescope) तयार केली जात आहे.
🔰दक्षिण आफ्रिकेच्या पुढाकाराने ‘स्क्वेअर किलोमीटर अॅरे (SKA)’ हा विशाल मल्टी-रेडियो टेलीस्कोप प्रकल्प राबवला जात आहे, ज्यांचा विकास ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड आणि दक्षिण आफ्रिकेत होत आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत किमान 3000 चौ. किलोमीटरच्या क्षेत्रफळात रिसीव्हींग स्टेशन स्थापित केले जात आहेत. 1 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात 1 डिश (छत्री) याप्रमाणे दोन्ही खंडामध्ये एकूण 3000 डिश उभारण्यात येत आहे.
🔰ही दुर्बिण कार्यरत झाल्यानंतर इतर कोणत्याही दुर्बिणीच्या 50 पट संवेदनशीलतेच्या तुलनेत 10,000 पट अधिक वेगाने तारांगणाची माहिती घेतली जाऊ शकणार आणि हबल अंतराळ दुर्बिणीच्या पृथक्करण (resolution) गुणवत्तेपेक्षाही अत्याधिक पटीने गुणवत्तापूर्ण प्रतिमा घेतल्या जाणार.
No comments:
Post a Comment