🔰ऑस्ट्रेलिया आणि भारतातील प्रतिभावान विद्यार्थी आणि स्टार्टअप उद्योगांना अभिनव तंत्रज्ञानाच्या मदतीने सामायिक समस्या सोडवण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने “भारत-ऑस्ट्रेलिया चक्रीय अर्थव्यवस्था (I-ACE) हॅकाथॉन, 2021” आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन 18 फेब्रुवारी 2021 रोजी झाले.
🔰‘चक्रीय अर्थव्यवस्था' मॉडेल, जे केवळ कचरा व्यवस्थापन करत नाही तर पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया आणि जबाबदार उत्पादन जे नवीन उद्योग आणि रोजगारांच्या विकासात सहाय्य करू शकते, उत्सर्जन कमी करते आणि नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर वाढवते.
🅾️ठळक बाबी
🔰भारताच्या नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन (CSIRO) या संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
🔰पकेजिंग कचरा कमी करणारे पॅकेजिंगमधील नावीन्यपूर्ण संशोधन, नासाडी टाळणारे अन्नपुरवठा साखळीतील नवसंशोधन, प्लास्टिक कचरा कमी करण्याच्या संधी निर्माण करणे आणि महत्वपूर्ण ऊर्जा धातू आणि ई-कचरा यांचा पुनर्वापर करणे, अश्या विविध विषयांवर हा कार्यक्रम केंद्रित केला गेला आहे.
🔰दोन्ही देशांकडून प्राप्त झालेल्या 1000 हून अधिक अर्जाची कठोर तपासणी प्रक्रिया झाली, त्यानंतर अव्वल 80 अर्जांची निवड द्विपक्षीय हॅकेथॉनसाठी केली गेली, ज्यामध्ये दोन्ही राष्ट्रांचे विद्यार्थी आणि स्टार्टअप उद्योगांना प्राधान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या अभिनव पद्धतींवर एकत्र काम करतील. निवड झालेल्या संघानी प्रासंगिक, नाविन्यपूर्ण, अंमलबजावणी योग्य, प्रभावी आणि जागतिक बाजारपेठेत व्यावसायीकरण करता येतील अशा कल्पक उपाययोजनांवर काम करणार आहे.
No comments:
Post a Comment