● पार्शभूमी
● १२ च्या शतकाच्या अखेरीस घुरचा महमूद (Mahamud of Ghur) याने भारतावर हल्ले केले. त्यांच्या परिणामस्वरूप सन १२०६ मध्ये त्याचा गुलाम कुत्बुद्दिन ऐबक याने ‘दिल्ली सल्तनत’ (Delhi Sultanate) ची स्थापना केली.
● सन १२०६ ते १५२६ दरम्यान दिल्ली सल्तनतच्या पाच घराण्यांनी राज्य केले: गुलाम घराणे, खल्जी घराणे, तुघलक घराणे, सय्यद घराणे व लोधी घराणे. तुघलक घराण्याच्या हासानंतर १४ व्या शतकाच्या मध्यावर दक्षिणेत बहमनी राज्य (१३४७ ते १५ व्या शतकाची अखेर) व विजयनगर साम्राज्य (१३३६ ते १६ व्या शतकाची अखेर) या राज्यांची निर्मिती झाली.
● पुढे १५ व्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्याचे तुकडे होऊन पाच राज्यांची निर्मिती झाली: अहमदनगरची निझामशाही (१४९०-१६३३), विजापूरची अदिलशाही (१४९०१६८६), व-हाडची इमादशाही (१४९०- १५७४),गोवळकोंड्याची कुतुबशाही (१५१८-१६८७), व बिदरची बारिदशाही (१५२८-१६१९).
● पानिपतच्या पहिल्या युद्धात (१५२६) दिल्लीचा सुलतान इब्राहिम खान लोधी याचा पराभव बाबरने केला. (बाबर हा मध्य आशियातील समरकंदचा शासक होता, मात्र पराभवामुळे त्याला राज्य गमवावे लागले होते. त्यामुळे त्याला दक्षिणेकडे २ स्थलांतर करावे लागले. त्याने प्रथम काबूल काबीज करून
नंतर भारतावर स्वारी केली.) अशा रितीने बाबरने भारतात मुघलांची सत्ता प्रस्थापित केली. बाबरनंतर त्याचा मुलगा हुमायून (१५३०-४० व १५५५-५६) याने राज्य केले.मुघल साम्राज्याचा खरा विस्तार अकबर (१५५६-१६०५),जहांगीर (१६०५-२७), शहाजहान (१६२७-५८) व औरंगजेब (१६५८-१७०७) यांच्या काळात घडून आला.त्यामुळे औरंगजेब पर्यंतच्या मुघल बादशाहांना ‘साम्राज्यवादी मुघल’ (Imperial Mughals) असे म्हणतात.
● औरंगजेब बादशाहाच्या मृत्यूनंतर (१७०७) मात्र मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. औरंगजेबानंतरच्या बादशाहांना ‘उत्तर मुघल’ (Later Mughals) म्हणतात. १८५७ च्या उठावापर्यंत मुघल बादशहांनी दिल्लीहून राज्य केले, मात्र ते केवळ नावाचेच ‘बादशाह’ होते. त्यांच्या नियंत्रणाखालील प्रदेश सतत कमी होत गेला. शाहआलम दुसरा तर ‘निर्वासित बादशाह’ (fugitive emperor) होता,
त्याला महादजी शिंदेंनी दिल्लीच्या गादीवर पुन्हा प्रस्थापित (reinstate) केले.
● औरंगजेबानंतरच्या मुघल बादशाहांबद्दल थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे:
◆ १)बहादूर शाह पहिला (१७०७-१२)
● औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल गादीसाठी त्याच्या तीन मुलांमध्ये झालेल्या युद्धानंतर बहादूर शाह बादशाह बनला. सत्तेवर ते आल्यावर त्याने शाहआलम पहिला हे नाव धारण केले.
● त्याच्या काळात शिखांबरोबर समझौता होऊन गुरू गोविंद सिंह यांना मुघल सेवेत घेण्यात आले. मात्र ही युद्धबंदी तात्पुरती ठरली. गुरू गोविंद सिंह यांच्या मृत्यूनंतर (१७०८) शिखांनी बंदा बहादूरच्या नेतृत्वाखाली मुघलांविरूद्ध बंड केले.
● बुदेला व जाट यांबरोबरही मुघलांचा समझौता होऊन त्यांचे प्रमुख अनुक्रमे छत्रसाल व चुडामण यांना मुघल सेवेत घेण्यात आले.
● बहादूर शाहाने छ. शाहू राजांना (संभाजी महाराजांचा पुत्र) कैदेतून मुक्त केले. शाहू राजे महाराष्ट्रात परतल्याने ताराबाई व शाहू यांमध्ये गृहयुद्ध सुरू झाले.
◆ २)जहांदर शाह (१७१२-१३)
● बहादूर शाहाच्या चार मुलांमध्ये गादीसाठी झालेल्या संघर्षात जहांदर शाह यशस्वी ठरला. झुल्फिकार खान या मुघल सरदाराने (nobles)किंग-मेकर म्हणून कार्य कगागात्ती हाशा केलेल्या मदतीने तो गादीवर आला.
◆ ३)फारूक सियार (१७१३-१९)
•फारूक सियार सय्यद बंधू (अब्दुल्ला खान व हुसून अली) या सरदारांच्या मदतीने गादीवर आला. अब्दुल्ला खानला वझीर तर हुसेन अलीला मीर बक्षी बनविण्यात आले. मात्र त्याचबरोबर बादशाह व सय्यद बंधू यांमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला. सय्यद बंधूंनी फारूकचा खून घडवून आणला व बहादूर शाहचा नातू रफी-उद-दरजत याला बादशाह बनविले. मात्र त्याला लवकरच मृत्यू झाला.
● फारूक सियारच्या काळात शिखांचा नेता बंदा बहादूर यास पकडण्यात आले व मारण्यात आले.
● १७१७ चे फर्मान: १७१७ मध्ये फारुक सियारने फर्मान जारी करून ईस्ट इंडिया कंपनीला गुजराथ व दख्खनमध्ये व्यापारी विशेषाधिकार प्रदान केले.
◆ ४)मुहम्मद शाह (१७१९-४८)
● रफीच्या मृत्यूनंतर सय्यद बंधूंच्या मदतीने मुहम्मद शाह गादीवर आला. १७२० मध्ये इतर सरदारांनी सय्यद बंधूंविरूद्ध कट रचून त्यांचा खून घडवून आणला.
● ऐशोआराम व राज्य कारभाराकडे दुर्लक्ष यांमुळे मुहम्मद शाहला (मुहम्मद शाह ‘रंगिला असे नाव पडले. त्याच्या काळात १७३८ मध्ये पहिल्या बाजीरावाने दिल्लीवर हल्ला करून दिल्लीत प्रवेश केला.
● मुहम्मद शाहच्या काळातच हैद्राबाद, अवध व बंगाल ही प्रादेशिक स्वायत्त राज्ये निर्माण झाली. मुघलांच्या सेवेत असलेल्या सरदारांनी/सुभेदारांनी मुघलांपासून विभक्त होऊन त्यांची स्थापना केली.
● १७३८-३९ मध्ये अफगाणिस्तानचा शासक नादीर शाह याने भारतावर हल्ला केला व दिल्लीची कठोरपणे लूट केली. त्याने मुघलांकडून सिंधू नदीच्या पश्चिमेकडील प्रदेश काढून घेतला. तसेच नादीर शाहने मुघलांकडून कोहीनूर हिरा, मयुरासन (Peacock Throne) व इतर मौल्यवान वस्तू बळकावल्या.
◆ ५)अहमद शाह (१७४८-५४)
● अहमद शाहच्या काळात अहमद शाह अब्दालीचे
(अफगाणिस्थानचा शासक व नादीर शाहचा पूर्वीचा जनरल) भारतावरील हल्ले. सुरू झाले. अहमदशाहाचा वझीर इमादउल-मुल्क याने त्यास आंधळे बनवून आलमगीर दुसरा यास गादीवर बसविले.
◆ ६)आलमगीर, दुसरा (१७५४-५९)
● त्यास १७५९ मध्ये त्याचा वझीर इमाद-उल-मुल्क याने ठार केले.
◆ ७)शाहआलम, दुसरा (१७५९-१८०६)
● तो आलमगीर, दुसरा याचा मुलगा होता. सत्तेवर आल्यावरही १२ वर्षे तो त्याच्या वझीराच्या भितीमुळे आपल्या राजधानीत राहत नव्हता.
● १७६४ मध्ये बक्सरच्या लढाईत मीर कासीम व शुजा उद्दौल्ला यांच्या बरोबर शाहआलम पराभूत झाला. १८०३ मध्ये इंग्रजांनी दिल्लीवर कब्जा मिळविला व शाहआलमला अटक केला.
जारी इंग्रजांच्या कैदेतच त्याचा १८०६ मध्ये मृत्यू झाला.
◆ ८)अकबर, दुसरा (१८०६-३७)
● अकबर, दुसरा याने राम मोहन रॉय यांना राजा’ ही पदवी देऊन त्यांना इंग्लंडला पेन्शन वाढीसाठी स्वत:ची बाजू मांडण्यासाठी पाठविले.
◆ ९)बहादूरशाह जफर, दुसरा (१८३७-६२)
● हा शेवटचा मुघल बादशाह ठरला. १८५७ च्या उठावानंतर त्याला १८५८ मध्ये रंगूनला हद्दपार करण्यात आले, जेथे त्याचा १८६२ मध्ये मृत्यू झाला. बादशाह बहादूरशाह जफर हा उच्च प्रतिभेचा कवी होता. त्याने आपल्या व्यथा ‘गझलां’मधून नोंदवून ठेवल्या आहेत. रंगूनच्या तुरुंगात अत्यंत दयनीय जीवन जगणारा हा कविमनाचा बादशाह उद्याच्या आपल्या दशनीय मृत्यूचे उद्धस्त चिंतन करतांना म्हणतो,
“कितना है बदनसीब जफर दफन के लिये
दो गज जमीन भी न मिली कोई यार में”
(अरे जफर किती दुदैवी आहेस, तुला तुझ्या आप्त, मित्रांच्या साक्षीने तुझ्या मातृभूमीत तुला पुरण्यासाठी दोन हात जमीनदेखील नाही.)
No comments:
Post a Comment