Friday, 12 February 2021

भारतात पहिल्यांदाच डिझेल ट्रॅक्टरला CNG ट्रॅक्टरमध्ये रूपांतरित केले.



🔰भारतात पहिल्यांदाच डिझेल ट्रॅक्टरला CNG ट्रॅक्टरमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे आता बहुउपयोगी ट्रॅक्टर डिझेल इंधनाचा वापर न करता कॉमप्रेस्ड नॅच्युरल गॅस (CNG) या इंधनाचा वापर करू शकणार, ज्यामुळे प्रदूषणाला आळा बसतो.


🔰अश्या पहिल्या-वहिल्या ट्रॅक्टरचे औपचारिक उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 12 फेब्रुवारी 2021 रोजी झाले.


🔰रॉमट्ट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिल्ल इंडिया या कंपन्यांनी संयुक्तपणे केलेले हे रूपांतरण, शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्पन्न वाढविण्यास आणि ग्रामीण भारतात नोकरीच्या संधी निर्माण करण्यास मदत करेल.


🔰इधन खर्चावर वर्षाकाठी एक लक्षाहून अधिक रुपयांची बचत करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.


🔴CNGचे फायदे....


🔰कार्बन व इतर प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी असल्याने हे स्वच्छ इंधन आहे.

हे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे कारण यात शिसे नसून ते न गंजणारे, संहत आणि प्रदूषण न करणारे असल्यामुळे इंजिनचे आयुष्य वाढविण्यात मदत करण्याबरोबरच नियमित देखरेखही कमी करावी लागते.


🔰डिझेल / पेट्रोल वरील वाहनांपेक्षा CNG वरील वाहनांचे सरासरी माइलेज चांगले आहे.ते सुरक्षित आहे कारण CNG टाक्या कडक सीलसह येतात, ज्यामुळे इंधन भरताना किंवा गळती झाल्यास स्फोट होण्याची शक्यता कमी असते.


🔰हा कचऱ्यातून संपत्तीचा एक भाग आहे कारण बायो-CNG तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून कापणी पश्चात पिकांच्या अवशेषांचा उपयोग (परळी) केला जाऊ शकतो, जो शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील बायो-CNG उत्पादन केंद्रामध्ये विकून पैसे कमावण्यास मदत करेल.


🔰डिझेलच्या तुलनेत होणारे एकूण उत्सर्जन 70 टक्के कमी झाले आहे.

सध्याच्या डिझेलचे दर प्रति लिटर 77.43 रुपये आहेत तर CNG फक्त 42 रुपये प्रति किलो आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...