राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अहमदाबाद येथील मोटेरातल्या “नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम”चे उद्घाटन करण्यात आले. ते जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे.
अहमदाबादचे मैदान आधी ‘मोटेरा स्टेडियम’ या नावाने ओळखले जात होते. संपूर्ण नूतनीकरणानंतर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा निर्णय गुजरात क्रिकेट असोसिएशनने घेतला.
▪️ठळक वैशिष्ट्ये
या मैदानामध्ये 1 लक्ष 32 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.
या मैदानामध्ये सहा लाल मातीच्या आणि पाच काळ्या मातीच्या अशा अकरा खेळपट्ट्या आहेत.
मैदानामध्ये सॉइल ड्रेनेज सिस्टिम आहे. त्यामुळे पाऊस पडल्यास 30 मिनिटांच्या आत पाणी सुकून जाईल. त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ नव्या व्यवस्थेमुळे येणार नाही.
मैदानामध्ये 55 खोल्यांचा एक क्लब आहे. तसेच स्टेडियममध्ये 75 वातानुकूलित कॉर्पोरेट बॉक्स आहेत.
मैदानाच्या परिसरात तीन हजार कार आणि दहा हजार दुचाकीच्या पार्किंगसाठी विशेष व्यवस्था आहे.
नवे मैदान 800 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल क्रिडा संकुलाचा एक भाग आहे. सरदार वल्लभभाई पटेल क्रिडा संकुलात जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदाना आहे.संपूर्ण क्रिडा संकुल 63 एकरपेक्षा जास्त भूखंडावर पसरले आहे.
मैदानाच्या जवळ फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी, बॉक्सिंग, लॉन टेनिस, रनिंग ट्रॅक, ऑलिंपकच्या दर्जाचा मोठा स्वीमिंग पूल तयार करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment