🔰पर्यटन धोरण- २०१६ मधील तरतूदीनुसार तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली.
🔰मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या कॅराव्हॅन पर्यटन धोरणास मंजुरी देण्यात आली. या धोरणाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाल्यास परदेशामध्ये एखाद्या ठराविक ठिकाणी मोठ्या संख्येने कॅरॅव्हॅन उभ्या करुन पर्यटक एकत्र जमतात तसेच चित्र लवकरच महाराष्ट्रात दिसू शकेल.
🔰करॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे दोन भाग या धोरणात असून यामुळे राज्यातील वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा लाभ सहजपणे पर्यटकांना घेता येईल. तसेच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी या धोरणांचा हातभार लागणार आहे. मुद्रांक शुल्कामध्ये सूट, राज्य वस्तु व सेवा कराचा परतावा, विद्युत शुल्कामध्ये सूट यासारखी प्रोत्साहने कॅरॅव्हॅन पार्क तसेच कॅरॅव्हॅन पर्यटनाकरीता लागू केल्या जाणार आहेत. पर्यटन संचालनालयाकडे कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक असणार आहे.
🔰करॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क व्यावसायिकांना पर्यटन संचालनालयामार्फत मार्केटिंग, स्वच्छता, व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच त्यांची प्रसिध्दी देखील करण्यात येईल असं सरकारने स्पष्ट केलं आहे. या कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅनवर आधारित पर्यटन संकल्पनेमुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा तसेच खाजगी गुंतवणूकीसही प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक सहलींचे आयोजन, हॉटेल्स आणि रिसॉर्ट या पारंपरिक निवास व्यवस्थेपेक्षा वेगळा अनुभव, ना विकास क्षेत्राचा योग्य वापर, दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment