🔰भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याने धोक्याचा इशारा दिलेल्या ९७ टक्के खात्यांवर ट्विटरने बंदी घातली आहे. शेतकरी आंदोलनातील ट्रॅक्टर मोर्चाच्या वेळी २६ जानेवारीला जो हिंसाचार झाला होता त्या वेळी ट्विटरवरील संदेशांचा वापर करण्यात आल्याचा सरकारचा आरोप आहे.
🔰टविटरच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनावेळी गैरमाहिती पसरवली गेली तसेच शेतक ऱ्यांच्या मोर्चावेळी हिंसाचार झाला. ट्विटरचे प्रतिनिधी व माहिती तंत्रज्ञान सचिव यांच्यात बुधवारी सायंकाळी बैठक झाली असून त्यात ट्विटरला निर्वाणीचा इशारा देण्यात आला व संबंधित खाती बंद केली नाहीत तर कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दम देण्यात आला.
🔰सथानिक कायद्यानुसार कारवाईचा बडगा उगारला जाण्याच्या भीतीने ट्विटरनेही आता सरकारने सांगितल्यापैकी ९७ टक्के ट्विटर खात्यांवर बंदी घातली आहे. ट्विटरने प्रक्षोभक आशय काढून टाकण्यात दिरंगाई केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम झाला असे सरकारचे म्हणणे आहे. युएस कॅपिटॉल हिल हिंसाचारात ट्विटरने तातडीने कारवाई केली होती तशी प्रजासत्ताक दिनी पसरवल्या गेलेल्या गैरमाहितीवर तातडीने कारवाई का केली नाही, असे ट्विटरच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आले.
No comments:
Post a Comment